रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी खडड्यात वृक्षारोपण

दिगंबर पाटोळे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

वणी (नाशिक) : वणी-भातोडे रस्ता खड्यात हरवला गेला असून स्थानिक लोकप्रतिनिधीं बरोबरच सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असून स्वातंत्र्य मिळाल्यापासून एसटी बस न पाहिलेल्या या गावातील ग्रामस्थांकडे एसटी नको पण किमान रस्ता तरी द्या असे म्हणण्याची वेळ आली असून काल (ता. 28) चक्क लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यातील खड्डयात  ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.

वणी (नाशिक) : वणी-भातोडे रस्ता खड्यात हरवला गेला असून स्थानिक लोकप्रतिनिधीं बरोबरच सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असून स्वातंत्र्य मिळाल्यापासून एसटी बस न पाहिलेल्या या गावातील ग्रामस्थांकडे एसटी नको पण किमान रस्ता तरी द्या असे म्हणण्याची वेळ आली असून काल (ता. 28) चक्क लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यातील खड्डयात  ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.

सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी वसलेले भातोडे हे गाव वणी पासून पाच किलो मीटर अंतरावर आहे. सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेले भातोडे गाव मात्र अरुंद रस्ता व रस्त्याची दुरावस्था यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यापासून या गावात एसटी बस पोहोचू शकलेली नाहीच, मात्र खाजगी प्रवासी वाहानेही या गावात येत नाही. या भागातील सुमारे दिडशे ते दोनशे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यीना पाच किलोमीटरची पायपीट करीत ज्ञानार्जनासाठी वणीला यावे लागते.

ग्रामस्थांना स्वत:च्या वाहनांद्वारेच बाजार, दवाखाना व इतर कामासाठी यावे जावे लागते. एखादा बाहेरगावाहून पाहुणा आला गेला तर त्यालाही पायपीट करीत इच्छीत ठिकाण गाठावे लागते. त्यातच रात्री बेरात्री अप्रिय घटना घडली किंवा अचानक आजारी झालेल्या रुग्णास दवाखान्यात नेणेही अवघड होते. दर वर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर कोणतेही वाहन तर नाहीच तर पायी चालनेही अवघड होते. पावसाळ्यात तर देव नदीवरील पुलावरुन पाणी असल्याने भातोडे गावाशी अनेकदा संपर्क तुटला जातो. अशा वेळी भातोडेकरींना चंडीकापूर मार्ग आठ किलो मिटरचा फेरा मारुन यावे जावे लागते व याही रस्त्याचीही चंडीकापूर ते भातोडे या दरम्यान दुरावस्था झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना वेळोवेळी रस्त्याची मागणी केली मात्र सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. दरम्यान आज (ता. 29) वणी भातोडे दरम्यान शाळा व महाविद्यालयासाठी दररोज 10 किमी पायपीट करणाऱ्या विद्यार्थी व ग्रामस्थांना या मार्गावरील रस्त्यातील खड्डयांमध्ये वृक्षारोपण करुन लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

गेल्या पाच वर्षांपासून वणी भातोडे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी लोकप्रतिनिंधीना भेटून रस्त्याची मागणी केली. मात्र आजी माजी लोकप्रतिनिधीं कुठलीच दखल घेतली नाही. दोन महिन्यांपासून या रस्त्यावर पायी चालनेही अवघड झाले आहे. 
- दशरथ महाले, सामाजिक कार्यकर्ते

आमच्या गावाला येणारा रस्ता हा मळ्यात जाणाऱ्या रस्त्यासारखा झाला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे खाजगी प्रवाशी वाहानेही येत नसल्याने वणी येथे येऊन जाऊन दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्यामुळे अभ्यासाला वेळ तर मिळतच नाही पण कॉलेजलाही पुलावर पाणी असल्यास पोहचता येत नाही. त्यामुळे आमचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- नितीन चव्हाण, महाविद्यालयीन विद्यार्थी, भातोडे

Web Title: students did tree plantation in potholes demanding road in wani