सामान्य निवड चाचणीत 800 विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 22 जुलै 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात स्थापलेल्या 'विद्यार्थी विकास मंच'तर्फे (ता.21 जुलै) सामान्यज्ञान निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नववी ते बारावी व प्रथम वर्ष कला ते तृतीय वर्ष कला या वर्गांतील सुमारे आठशेवर विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला. शाळा व महाविद्यालयांतील हुशार, गोरगरीब, गरजू, ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

नववी, दहावीच्या वर्गातून चारशेवर, अकरावी, बारावीच्या वर्गातून सुमारे तीनशे तर वरिष्ठ महाविद्यालयातून शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. पंचवीस वस्तुनिष्ठ प्रश्नांची, पन्नास गुणांची व एका तासाची ही बहुपर्यायी सामान्यज्ञान परीक्षा होती. विद्यार्थ्यांकडून नाममात्र परीक्षा शुल्क घेण्यात आले. या तिन्ही गटांतून प्रत्येकी पन्नास विद्यार्थी याप्रमाणे सुमारे दीडशे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करून त्यांना संपूर्ण वर्षभर स्पर्धा परिक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षक, प्राध्यापक व अधिकारी मार्गदर्शन करतील. संचालक मंडळाच्या कल्पकतेतून व शिक्षकांच्या आर्थिक योगदानातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

अॅड. शरदचंद्र शाह यांचा कृतीतून आदर्श 
यापूर्वी संस्थेचे ज्येष्ठ संचालक व वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष अॅड. शरदचंद्र शाह यांनी 27 ऑगस्ट 2015 मध्ये आपल्या अमृतमहोत्सवी (75व्या) वाढदिवसानिमित्त विद्यार्थी विकास मंचसाठी 75 हजार रुपये देणगी स्वरूपात दिले होते. आतापर्यंत हा उपक्रम केवळ वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित होता. परंतु ह्या वर्षापासून या उपक्रमात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

संस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष सुहासभाई शाह, वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष अॅड. शरदचंद्र शाह, शालेय समिती अध्यक्ष अजितचंद्र शाह, संस्थेचे खजिनदार दत्तात्रय वाणी, सचिव नितीन शाह, सहसचिव किशोर शाह, संचालक बारीक पगारे, राजेंद्र वाणी, विठ्ठलराय उपासनी, राजेंद्र येवले, राघो पगारे आदींच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. अशोक खैरनार, मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी आदी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. निवड चाचणीच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक शरद जगताप, प्रा.रामचंद्र सोंजे, प्रा.अजबराव इंगळे, प्रा.प्रणव गरुड आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students participate in the general selection test