Nandurbar News : मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करा; जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांचे आवाहन

Application Submission News
Application Submission Newsesakal

Nandurbar News : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

मध केंद्र योजना सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येईल व ५० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.

शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यासोबत मधमाश्या संरक्षक व संवर्धन याबाबत मोफत प्रशिक्षण व जनजागृती मंडळामार्फत करण्यात येते. (Submit application for Madh Kendra Yojana Appeal of District Village Industries Officer Rajendra Chavan Nandurbar News)

वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.

केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ योजनेसाठी मधपाळ संस्था, व्यक्तींना प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार किमान दहावी पास असावा आणि वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे.

अर्जदार व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडेतत्त्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाश्यापालन, प्रजनन व मध उत्पादनबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Application Submission News
Crime news : व्याघ्र प्रकल्पातील टायगर पॅराडाईज रिसॉर्टवर पोलिसांचा छापा

केंद्रचालक मधपाळ प्रशिक्षण संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर एक एकर शेतजमीन असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्त्वावर १००० चौरसफूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाश्यापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.

येथे करा संपर्क

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मधव्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे आणि मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधितांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.

योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला रूम नं. २२२, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार, दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१००५३ येथे संपर्क साधावा.

Application Submission News
MGNREGA News: ग्रामपंचायतींमध्ये आता अतिरिक्त ग्रामरोजगार सेवक! मनरेगाची कामे वेळात होण्यासाठी शासनाकडून आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com