धुळे- सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व विभागांना शंभर दिवसांच्या कृती आराखड्यातंर्गत सात कलमी कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या शंभर दिवस कृती आरखड्याचा अंतिम मूल्यमापन अहवाल सर्व कार्यालयप्रमुखांनी विहीत वेळेत सादर करावा, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी दिली.