Chetak Festival : चेतक महोत्सवात मुकेश पटेल स्कूलचे यश; 16 पदके प्राप्त

मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सारंगखेडा (ता. शहादा) येथील चेतक महोत्सवात घोडेस्वारी स्पर्धेतील विविध प्रकारात लक्षणीय कामगिरी बजावत एकूण १६ पदके पटकावली.
Success of Mukesh Patel School in Chetak festival
Success of Mukesh Patel School in Chetak festival esakal

Dhule News : तांडे (ता. शिरपूर) येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचालित मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सारंगखेडा (ता. शहादा) येथील चेतक महोत्सवात घोडेस्वारी स्पर्धेतील विविध प्रकारात लक्षणीय कामगिरी बजावत एकूण १६ पदके पटकावली. (Success of Mukesh Patel School in Chetak festival)

१२ वर्षांखालील गटात हॅक ॲन्ड राइड व पोल बेंडिंग अशा दोन प्रकारांत कार्तिक पाटील याने रौप्यपदक, १४ वर्षांखालील गटात बॉल ॲन्ड बकेट प्रकारात तनिष्क साळुंके याने सुवर्णपदक, तर अंशुमन मंडलोई याने रौप्यपदक पटकावले.

ड्रेसेज प्रकारात अंशुमन मंडलोई याने कांस्यपदक, हॅक ॲन्ड राइड प्रकारात सान्वी परमारने रौप्यपदक, तर वेदांत पिरठाणीने कांस्यपदक पटकावले. पोल बेंडिंग प्रकारात वेदांत पिरठाणीने रौप्यपदक, तर तनिष्क साळुंकेने कांस्यपदक, शो-जंपिंग प्रकारात अंशुमन मंडलोईने कांस्यपदक, टॉप स्कोर प्रकारात वेदांत पिरठाणीने सुवर्णपदक, तर तनिष्क साळुंकेने कांस्यपदक पटकावले.

Success of Mukesh Patel School in Chetak festival
Bones Health : वाढत्या वयानुसार हाडे होतात कमजोर; बळकटीसाठी आहारात 'या' पोषकघटकांचा करा समावेश

१६ वर्षांखालील गटात ड्रेसेज प्रकारात मानस चौधरीने रौप्यपदक, तर अंशुमन मंडलोईने कांस्यपदक, हॅक ॲन्ड राइड प्रकारात धीरज चौधरीने सुवर्णपदक, शो-जंपिंग प्रकारात मानस चौधरीने कांस्यपदक, टॉप स्कोर प्रकारात राज पाटीलने सुवर्णपदक, तर धीरज चौधरीने रौप्यपदक पटकावले.

या विद्यार्थ्यांना घोडेस्वारी विभागाचे व्यवस्थापक युसूफ अली, प्रशिक्षक हेमसिंह शेखावत, राजेंद्र गिरासे यांचे मार्गदर्शन लाभले. आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतन पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, एसव्हीकेएम स्कूल डायरेक्टर गिरिजा मोहन, स्पोर्टस् डायरेक्टर किरण अंचन, प्राचार्य डॉ. जॉन लॉरेन्स यांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले.

Success of Mukesh Patel School in Chetak festival
Nandurbar Chetak Festival : राष्ट्रीय अश्वचित्र, शिल्प स्पर्धेत निरंजन शेलार प्रथम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com