Nandurbar : शहाद्यातील बालकांवर हृदयविकाराची यशस्वी शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

children has undergone surgery

Nandurbar : शहाद्यातील बालकांवर हृदयविकाराची यशस्वी शस्त्रक्रिया

शहादा (जि. नंदुरबार) : राष्ट्रीय बाल स्वास्थ मिशन (National Child Health Mission) व एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी, शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान शहादा तालुक्यातील चार बालकांना हृदयरोग (Heart disease) असल्याचे निदान झाले. या बालकांवर मुंबई येथील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben at Dhirubhai Ambani Hospital) यशस्वी शस्त्रक्रिया (Surgeries) करण्यात आली. (Successful heart surgeries in mumbai on children from shahada dhule news)

शहादा तालुक्यातील शिरूड येथील खुशी गणेश अलकरी (वय ४) मुंबई ठाणे येथील जुपिटर हॉस्पिटल, लोणखेडा येथील सुहानी वसंत पावरा (वय १८ महिने), शहादा येथील दिशांत अजय अहिरे (वय अडीच वर्ष ), पुरुषोत्तम नगर येथील गुणवंत वसंत वाघ (वय ९) या तिघांची अंधेरी मुंबई येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल येथे हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आली.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकत्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद बाविस्कर, डॉ. कल्पना भंडारी, औषधनिर्माण अधिकारी पवन चौधरी यांच्या पथकाकडून शास्त्रक्रियेपूर्वी तपासणी करण्यात आली, त्यात सदर बालकांना हृदयरोगाचे निदान झाले होते. याबाबत समुपदेशन डॉ. बाविस्कर आणि पथका मार्फत करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक मा.डॉ. चारुदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना बागूल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास पाटील, एकात्मिक बाल विकास शहादा प्रकल्प अधिकारी रणजित कुऱ्हे, म्हसावदचे प्रकल्पाधिकारी फारुक शेख, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर ढिवरे तसेच जिल्हा कार्यक्रम सहाय्यक करण वसावे सांख्यिकी अन्वेषक धर्मेश भट यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा: आदिवासी आयुक्तालय राबविणार प्रधानमंत्री ‘वन-धन’ योजना

"चारही बालकांची गुंतागुंतीची हृदयशस्त्रक्रिया झाली आहे. बालकांना जन्मजात हृदयरोगाचे हे प्रमाण साधारण हजारी पाच ते सहा हजार बालकांमध्ये आढळते. ही शस्त्रक्रिया झालेल्या बालकांपैकी सुहानी पावरा या बालिकेला सुरवातीला रक्ताचे प्रमाण अगदी कमी तसेच ऑक्सिजन पातळी ही ५५ टक्के असल्याने शस्त्रक्रिया करताना जिकरीचे होते. तरी देखील निदान व्यवस्थित झाले. बालकाला आर. बी. एस. के. पथक शहादा यांनी मुंबईत आणले होते. बालकाला सलग वीस दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. सध्या सर्व बालके सुव्यवस्थित आहेत. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या बालकाच्या पाल्यांनी आरोग्य प्रशासनास कळवावे."

- डॉ. चारुदत्त शिंदे, शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नंदुरबार

हेही वाचा: Nashik : अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडली

Web Title: Successful Heart Surgeries In Mumbai On Children From Shahada Dhule News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..