नैराश्य, संतापात कोणाला न सांगता घरून निघाला; आणि पूलावरुन थेट नदीत उडी मारून संपवले जीवन    

रमेश पाटील
Friday, 22 January 2021

संताप व नैराश्यातून कुणालाही न सांगता घरातून स्वतःच्या मोटारसायकलने निघून गेला. परिवार, समाज व मित्रांनी पंकजला शोधण्यास सुरुवात केली.

सारंगखेडा: शहादा येथील 28 वर्षीय युवकाने सारंगखेडा (ता. शहादा ) येथील तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचे मृतदेह आज तरंगतांना आढळून आले.

आवश्य वाचा- शहरात कंपाउंडर तर गावात डॉक्टर बनून थाटला व्यवसाय; छापा पडला आणि सत्य समोर आले !  
 

शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ लक्ष्मीनगरात वास्तव्यात असणारा पंकज प्रकाश तामसे (वय 28) या युवकाने 20 जानेवारीला पहाटे चारच्या सुमारास संताप व नैराश्यातून कुणालाही न सांगता घरातून स्वतःच्या मोटारसायकलने निघून गेला. परिवार, समाज व मित्रांनी पंकजला शोधण्यास सुरुवात केली. शोधत घेत असताना त्याची मोटार सायकल सकाळी 8 वाजता सारंगखेडा येथील तापी पुलावर लावलेली दिसली. मयत पंकजच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई वडील आणि एक भाऊ असा परिवार होता. पंकज हा शहाद्याला पीठ गिरणीचा व्यवसाय करीत होता.
 

नदीत सुरू झाली शोध मोहिम

त्यानंतर योगेश निकवाडे यांनी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना खबर दिली. परंतु पंकजने येथे पाण्यात उडी मारली आहे किंवा नाही याबद्दल कुठलाही पुरावा व शाश्वती करता येत नव्हती. परंतु पंकजची स्वतःची मोटारसायकल तिथे उभी असल्याची माहिती घेत त्याने इथेच उडी मारलेली असावी असा अंदाज करीत सारंगखेडा येथील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मासेमारींना तात्काळ पाण्यात उतरवण्यात आले.

वाचा- सामान्य कुटुंबातील चौघा भावंडांचे एकच ध्येय; त्यांचा ‘मेडिकल’चा वाटेवरील प्रवास ! 
 

आणि तरंगताना पात्रात दिसला मृतदेह

परंतु पूर्ण दिवस तपास करून सुद्धा पंकजचा काहीच तपास लागला नाही. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे आज (22 जानेवारी) सकाळी सातला त्याचे मृतदेह नदी पात्रात पाण्यात तरंगताना दिसून आले. पोलीस निरीक्षक श्री. राजेश शिरसाठ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, हवालदार जितेंद्र सूर्यवंशी, विजय गावीत यांनी मच्छिमारांच्या मदतीने मयत पंकज यास बाहेर काढले व सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी ते पाठविण्यात आले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide marathi news sarankheda youth jumps bridge commits suicide