सुळे डाव्या कालव्याचे खामखेडा येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते जलपूजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

खामखेडा (नाशिक) - पत्तीस वर्षांपूर्वी सुळे डाव्या कालव्याची मंजुरी व प्रत्यक्ष काम होवून दहा वर्ष ओलांडली होती. ३७ किमी कालवा होऊन त्या टप्प्यात दोन ते तीन वेळा चाचण्या घेण्यात आल्या. मात्र पुढील टप्प्यात कालवा पूर्ण झाल्यावर दहा वर्ष्यात पाणी मिळाल्याने नुकतेच आमदार डॉ. राहुल आहेर, केदा आहेर व धनश्री आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

खामखेडा (नाशिक) - पत्तीस वर्षांपूर्वी सुळे डाव्या कालव्याची मंजुरी व प्रत्यक्ष काम होवून दहा वर्ष ओलांडली होती. ३७ किमी कालवा होऊन त्या टप्प्यात दोन ते तीन वेळा चाचण्या घेण्यात आल्या. मात्र पुढील टप्प्यात कालवा पूर्ण झाल्यावर दहा वर्ष्यात पाणी मिळाल्याने नुकतेच आमदार डॉ. राहुल आहेर, केदा आहेर व धनश्री आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

सुळे डावा कालव्याचे ४२ किमीच्या टप्प्यातील काम रखडले होते. या पुढच्या कामाला गती मिळावी म्हणून स्वर्गीय माजी आरोग्य मंत्री डॉ. डी. एस. आहेर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून पुढील कामाची निविदा काढून कामाला सुरुवात केली होती. परंतु, ३८ किमीच्या टप्प्यात काही शेतकऱयांनी कालव्याच्या कामाला हरकत दिल्याने सात आठ वर्षे कालव्याचे काम बंद होते. तत्कालीन जि.प.सद्ष्य व जिल्हा बँकेच्या अध्यक्ष केदा आहेर, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मध्यस्थी करत तोडगा काढून या ४१० मीटरचे काम दोन वर्ष्या पूर्वी पूर्ण करूनं घेतले होते.

काम पूर्ण होवून देखील या कालव्यास ३७ किलोमीटरच्या पुढे पाणी मिळत नव्हते.या भागातील शेतकऱयांनी  या कालव्यास पाणी मिळावे म्हणून सातत्याने मागणी होती.कालव्याला पाणी सोडन्यासाठी केदा आहेर यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून आ डॉ आहेरांच्या माध्यमातुन या कालव्यास पाणी सोडण्यात आले.

कालव्याला जमिनी देऊन दहा वर्ष उलटून देखील पाणी मिळत नसल्याने ह्या भागातील शेतकऱ्यांमध्ये रोष होता.मात्र या वर्षी ऑगस्ट मध्ये कालव्याला पाणी सोडण्यात आले.कालव्याला पाणी सोडल्यामुळे सात आठ वर्ष्यापासून खामखेडा,सावकी,ठेंगोडा,दर्हाने भागातील दुष्काळी परिस्थितीत होरपळनाऱ्या या भागाचा पाणी प्रश्न काही अंशी सुटणार आहे.

आमदार डॉ. राहुल आहेर यांनी या कालव्याच्या पाहणी करत जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर व जि.प.सदस्या धनश्री आहेर यांच्या हस्ते कालव्याच्या ४० किमी टप्प्यात मांगबारी शिवारात जलपूजन करण्यात आले. यावेळी पं स सदस्य कल्पना देशमुख, पंकज निकम, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, सरपंच बापू शेवाळे, संतोष मोरे, अण्णा शेवाळे, संजय मोरे, दादाजी बोरसे, सुनील शेवाळे, यांसह परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: sule canals jalpujan by dr. rahul aaher in khamkheda