लाही लाही...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

जळगावचा पारा ४५ अंशांवर; दुपारी रस्ते निर्मनुष्य
जळगाव - दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे असह्य तापमानाचे चटके जाणवू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सूर्य जणू आग ओकू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे जळगावकरांना घराबाहेर पडणे कठीण बनले आहे. दुपारी एकनंतर तर रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसते. आज तर जळगाव शहराचा पारा ४५ अंशांवर पोहोचल्याने जिवाची लाही लाही होत आहे. 

शहरासह जिल्ह्यात एप्रिलअखेर तापमानाची तीव्रता वाढू लागली आहे. ‘मे’ हिटचा तडाखा एप्रिल महिन्यातच जाणवू लागला आहे. आठवडाभरापासून तापमानाचा पारा ४३ अंशांवर कायम होता. तर आता चार ते पाच दिवसांपासून पारा ४४ अंश पार केला आहे. जळगाव शहराचा पारा आज ४५ अंशांवर होता. त्यामुळे उन्हाची तीव्रता अन्‌ असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

सकाळी नऊलाच उन्हाचे चटके
तापमानाची तीव्रता वाढल्याने सकाळी नऊनंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागत आहे. असह्य उकाडा तसेच अंगाला चटके जाणवू लागत आहेत. यामुळे सकाळी नऊलाही घरातून निघताना रुमाल, टोपी, गॉगल घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे. 

दुपारी रस्ते निर्मनुष्य 
दुपारच्या वेळी तापमानाचा पारा अधिक असल्याने नागरिक दुपारी घरातून बाहेर पडत नाही. यामुळे दिवसभर शहरातील मुख्य रस्तेही ओस पडलेले पाहावयास मिळतात. तर सायंकाळी पाचनंतर रात्री उशिरापर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.

असे होते शनिवारचे तापमान
(स्कायमेट वेदर संस्थेच्या नोंदीनुसार)

 सकाळी ६     ः २६ अंश
 सकाळी ९     ः ३२ अंश
 दुपारी १२     ः ४१ अंश
 दुपारी ३     ः ४४ अंश
 दुपारी ४     ः ४५ अंश
 सायंकाळी ६     ः ४४ अंश

Web Title: summer temperature heat