Sunny Salve Case : तपास अधिकारी हिरे यांची आजही होणार साक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

Sunny Salve Case : तपास अधिकारी हिरे यांची आजही होणार साक्ष

धुळे : सनी साळवे (Sunny Salve Case) खून खटल्यात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांची न्यायालयात मंगळवारी (ता. १४) सलग दोन तास साक्ष झाली.

श्री. हिरे यांची साक्ष अपूर्ण असून, बुधवारी (ता. १५)देखील त्यांची साक्ष होणार आहे. (Sunny Salve Case Investigating officer Hire will testify today dhule news)

शहरातील देवपूर भागातील चंदननगर येथील रहिवासी सनी साळवे याचा १८ एप्रिल २०१८ ला सशस्त्र हल्ल्यातून खून झाला होता. या खून खटल्याचे कामकाज न्या. एम. जी. चव्हाण यांच्यासमोर सुरू आहे. यात या प्रकरणाचे तपास अधिकारी हिरे यांची साक्ष सुरू आहे.

मंगळवारी पहिल्या सत्रात सलग दोन तास त्यांची साक्ष झाली. घटनास्थळी दिलेली भेट, घटनेचा पंचनामा, आरोपींकडून जप्त केलेले कपडे व शस्त्र तसेच घटनेत वापरलेले हत्यार जप्त केल्याचे साक्षीदरम्यान तपास अधिकारी यांनी सांगितले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

तसेच तपासकामी घेतलेल्या आरोपींचा शोध, आरोपींना केलेली अटक, पोलिस व न्यायालयात हजर करून आरोपींना तपासकामी घेतलेली पोलिस कोठडी, घटनेच्या अनुषंगाने जप्त केलेले साहित्य, हत्यार, गाडी, कपडे, पंच व साक्षीदारांचे जबाब, घटनेत जखमी झालेल्यांचे जबाब आदी बाबी तारीख वेळ क्रमवारीत न्यायालयासमोर श्री. हिरे यांनी सांगितले.

श्री. हिरे यांची साक्ष अपूर्ण असून, बुधवारीदेखील ती पुढे सुरू राहील. या खून खटल्याकामी अनेक महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष झाली आहे. या खून खटल्यातील काही आरोपी तुरुंगात आहेत. याकामी विशेष सरकारी वकील श्यामकांत पाटील काम पाहत असून, ॲड. विशाल साळवे त्यांना सहकार्य करत आहेत.

टॅग्स :Dhulecrimemurder