Sunny Salve death Case : तपास अधिकाऱ्यांची 24 ला साक्ष

Dhule News
Dhule News sakal

धुळे : शहरातील देवपूर भागात झालेल्या सनी साळवे खून खटल्याचे पुढील न्यायालयीन कामकाज २४ फेब्रुवारीला होणार आहे. या वेळी या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांची महत्त्वपूर्ण साक्ष होणार आहे.

शहरातील देवपूर भागात १८ एप्रिल २०१८ ला सशस्त्र हल्ल्यात चंदननगर येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थी सनी साळवे याचा खून झाला होता. या खून खटल्याचे कामकाज न्या. एम. जी. चव्हाण यांच्या समक्ष सुरू आहे. या प्रकरणात आजपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष झाली असून, निकाल निर्णायक टप्प्यावर आहे. (Sunny Salve murder case Dhule News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Dhule News
Dhule News : अग्निवीर हिंदू संघटनेच्या सतर्कतेने 45 गोवशांना जीवदान

दरम्यान, पुढील कामकाज २४ फेब्रुवारीला होणार असून, या वेळी या खून खटल्यातील तपास पोलिस अधिकारी सचिन हिरे यांची न्यायालयात महत्त्वपूर्ण साक्ष सुरू होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या खून खटल्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात कामकाज सुरू असून, खून खटल्यातील काही आरोपी तुरुंगात आहेत. या खटल्यात विशेष सरकारी वकील श्‍यामकांत पाटील काम पाहत असून, ॲड. विशाल साळवे त्यांना मदत करत आहेत.

Dhule News
Dhule News : गावगुंडांचा बंदोबस्त व्हावा; महिलांची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com