पुरवणी परीक्षेला उद्यापासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

नाशिक - दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेला मंगळवारपासून (ता. 17) सुरवात होईल. दहावीचे पेपर दोन ऑगस्टपर्यंत, तर बारावीचे पेपर चार ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ऑक्‍टोबरऐवजी जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यास सुरवात झाली आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेची सुरवात प्रथम भाषा विषयाने होईल. अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, पुरवणी परीक्षेत उत्तीर्णांसाठी रिक्‍त जागांसाठी विशेष फेरी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर घेतली जात असते. त्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्णतेची अट पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल. बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या बहिःस्थ पदवी अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी उपलब्ध असेल.
Web Title: Supplement exam SSC HSC