देशव्यापी शेतकरी संपाला ऱोहना परिसराततील शेतकऱ्यांचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

आर्वी तालुक्यातील रोहना येथे युवा शेतकरी मंचच्या वतीने देशव्यापी शेतकरी संपाला जाहीर पाठींबा दर्शवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून जाहीर पाठींबा बुधवारी (ता .६) देण्यात आला.

आर्वी (वर्धा) - आर्वी तालुक्यातील रोहना येथे युवा शेतकरी मंचच्या वतीने देशव्यापी शेतकरी संपाला जाहीर पाठींबा दर्शवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून जाहीर पाठींबा बुधवारी (ता .६) देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. स्थानिक बस स्तानक परिसरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकरराव नायसे होते. सरपंच सुनिल वाघ, अरुणराव बोबडे, प्रा. संजय वानखेडे बाबासाहेब गलाट, स्वप्नील हिवसे आदीची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती

शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय आणी अत्याचार बिकट परिस्थिती यांचे विवेचन प्रा.संजय वानखेडे यांनी आपल्या भाषणांतून यावेळी केले. शेतकऱ्यांच्या समस्यावर प्रमुख अतिथीनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, महात्मा जोतिबा फुले यांचे प्रतिमाला हार अर्पण केली व शहीद शेतकरी शेतमजूर यांना श्रध्दांजली अर्पण करुन शेतकरी संपाला जाहीर पाठिंबा परिसरातील उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन धीरज बोबडे यांनी केले, तर प्रस्ताविक व आभार भारत शेंडे यांनी मानले.

Web Title: Support of farmers strike from rohana farmers in wardha district