
Dhule News : लुटीतील संशयित गजाआड
धुळे : देवपूरमधील श्री स्वामिनारायण मंदिराजवळील श्रीराम चौकात एकास मारहाण करीत लुटणाऱ्या संशयितास देवपूर पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत केली. त्याच्या पसार झालेल्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
योगेश सुकलाल निकम (वय ४३, रा. एकतानगर, बिलाडी रोड, देवपूर) ७ जानेवारीला दुचाकी (एमएच १८, एएम ३६७९)ने स्वामिनारायण मंदिर रोडवरील श्रीराम चौकाजवळून घरी जात होते. त्यांना मागून दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी थांबविले.
अकारण शिवीगाळ करत गालावर मारले. तसेच त्यांच्याकडील दोन हजारांची रोकड, एटीएम, पॅनकार्ड, आरसी बुक तसेच दुचाकी हिसकावून नेली. या प्रकरणी देवपूरला गुन्हा दाखल झाला. (Suspect in robbery grab a bike accomplice is still at large Jalgaon news )
आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
हेही वाचा: Nashik News: अंमलदारासाठी आयुक्तांचे निरीक्षकांना अल्टिमेटम; कर्मचाऱ्यांअभावी पथके होईना कार्यान्वित!
पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपासात अक्षय सुरेश चव्हाण (रा. दैठणकरनगर, वाडीभोकर रोड, देवपूर) व साथीदार अविनाश ऊर्फ गोल्या युवराज बोरसे यांनी हा प्रकार केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने अक्षय चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच दुचाकी काढून दिली. दुसरा संशयित अविनाश बोरसे फरारी आहे.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूरचे पोलिस निरीक्षक निकम, मिलिंद सोनवणे, राजेश इंदवे, राजेंद्र माळी, योगेश कचवे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, किरणकुमार साळवे, सुनील गवळे यांच्या पथकाने कारवाई केली.
हेही वाचा: Dhule News : वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त गावासाठी शवपेटी; निवृत्त प्राचार्यांचे दातृत्व