Dhule News : 17 वर्षांपासून फरारी संशयिताला अटक

crime
crime esakal

शिरपूर (जि. धुळे) : महिलांना देहविक्रीस भाग पाडल्याच्या गुन्ह्यात १७ वर्षांपासून फरारी असलेल्या संशयिताला शहर पोलिसांनी खर्दे (ता. शिरपूर) येथून ताब्यात घेतले.

त्याला मध्य प्रदेश पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. संशयिताने शिरपुरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय थाटल्याचे आढळले. (Suspect on run for 17 years for crime of forcing women into prostitution arrested dhule news)

मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर जिल्ह्यातील शिकारपुरा येथील कुंटणखान्यावर पोलिसांनी २००६ मध्ये छापा टाकला होता. त्या कारवाईत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चार महिला व तीन पुरुषांपैकी संशयित राजू ऊर्फ मूलचंद (रा. राजस्थान) फरारी होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. बऱ्हाणपूर न्यायालयाने त्याचे पकड वॉरंट जारी केले होते.

दरम्यान, शिकारपुरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक कुबेरसिंह जारत, महफूज अली, राजेश, शादाब आदींचा समावेश असलेले पथक शोध घेत असताना त्यांना राजू खानदेशात लपल्याची माहिती मिळाली. चोपडा आणि अमळनेर भागात तपास केल्यानंतर ते शिरपूरला येऊन पोचले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

crime
Dhule News : भुराबाई ठेलारींनी तोळाभर सोनपोत केली परत; संस्कारांचे मोल

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांना त्यांनी माहिती दिली. आगरकर यांच्या आदेशावरून शहर पोलिस ठाण्याचे हवालदार मनोज पाटील, पंकज पाटील, मुकेश पावरा, अमोल पगारे, आरिफ तडवी, अनिता पावरा, पौर्णिमा पाटील आदींनी शोध घेण्यास सुरवात केली.

त्यांना संशयित राजू ऊर्फ मूलचंद शहराजवळ शनिमंदिरामागे राहत असल्याचे समजले. मध्य प्रदेश व शिरपूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तो पत्नीसह तेथे राहत असून, पाणीपुरीचा ठेला चालवीत असल्याचे कळते. त्याला मध्य प्रदेश पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.

crime
Nashik News : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ट; ग्रामस्थांनी सुरु असलेले काम पाडले बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com