स्वाइन फ्लूपाठोपाठ नाशिक शहरात डेंगीचे १० रुग्ण

Dengue
Dengue

नाशिक - स्वाइन फ्लूपाठोपाठ शहरात डेंगीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात नव्याने १० रुग्ण आढळले. पावसाच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छतेचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

जुलैअखेरपर्यंत शहरात स्वाइन फ्लूच्या आजाराने तोंड वर काढले होते. तब्बल दीडशे रुग्ण आढळल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने चिंता व्यक्त करत नाशिक शहरात डॉक्‍टरांची कार्यशाळा घेतली. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका मुख्यालयात आजारांचा आढावा घेतला. स्वाइन फ्लूचा धोका दिसत असतानाच आता डेंगीने तोंड वर काढले आहे.

सन २०१७ मध्ये डेंगीचा सर्वाधिक प्रादुर्भाव होता. या वर्षात ९४९ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी सन २०१८ मध्ये ८४४ डेंगीचे रुग्ण आढळले. या आजाराने तिघांचा बळी घेतला होता. या वर्षात जानेवारी ते जूनअखेरपर्यंत डेंगीचे बारा रुग्ण आढळले. जुलैमध्ये रुग्णांची संख्या ४८ वर पोचली, तर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात शहरात १० रुग्ण नव्याने आढळले असून, एकूण बाधितांची संख्या ७० वर पोचल्याने डेंगीचा डंख वाढत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय विभागाने काढला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निकामी टायर, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदाणी, फ्रिज, कूलरच्या ट्रेमधील पाणी स्वच्छ करण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com