नाशिक पदवीधरच्या रिंगणात टी. के. बागूल उतरणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

नाशिक - निवृत्त सनदी अधिकारी ऍड. टिकाराम कथ्थू (टी. के.) बागूल हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून बुधवारी (ता. 11) अर्ज दाखल करणार आहेत. भारतीय प्रशासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजातील पदवीधरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे बागूल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बागूल यांनी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून नाशिकमधून प्रशासकीय सेवेला सुरवात केली. त्यानंतर जळगाव, नगर, नंदुरबार, नवी मुंबई, धुळे, गडचिरोली, मुंबई अशा अनेक ठिकाणी विविध पदांवर कामे केली. 2013 मध्ये नाशिक विभागाचे अपर आयुक्त म्हणून ते निवृत्त झाले. बागूल यांची बहुतेक सेवा ही नाशिक विभागात झाली आहे.
Web Title: t. k. bagul graduate constituency election