हमीभावासाठी विशेष अधिवेशन घ्या - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नाशिक - अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे कायद्याने शेतमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, या खासगी विधेयकाचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. हे खासगी विधेयक मांडण्यासाठी पुढील महिन्यात संसदेचे एक आठवड्याचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. तसेच महाराष्ट्रदिनी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभांमधून यासंबंधाने ठराव करण्यात येणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची वेळ मागितल्याचे त्यांनी सांगितले.

राजू शेट्टी म्हणाले की, आम्हाला आणखी धर्मा पाटील होऊ द्यायचे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही एकटे नाहीत, याचा विश्‍वास देण्यासाठी १ मेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी सन्मान अभियान राबवण्यात येणार आहे. धर्मा पाटील यांच्या विखरण (जि. धुळे) या गावातून त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्या सहकार्याने अभियानाची सुरवात होईल. त्याच दिवशी सायंकाळी शहादा येथे सभा होईल.

Web Title: Take special session for the warranty - Shetty