देशातील सर्वांत उंच तरुण प्रदर्शनातून भरतोय पोटाची खळगी 

अरुण मलाणी
शनिवार, 22 एप्रिल 2017

नाशिक - सामान्यपेक्षा अधिक उंची असलेली व्यक्‍ती असली, की मोठ्या गर्दीतही ओळखली जाते अन्‌ अशा व्यक्तींकडे अगदी सहज लक्ष जाणे स्वाभाविक आहे. साडेसहा-सात फुटांपर्यंतची व्यक्‍ती भेटणे सामान्य गोष्ट आहे. पण सध्या नाशिकमध्ये तब्बल आठ फूट एक इंच उंची असलेला उत्तर प्रदेशचा तरुण आलाय. या पस्तीसवर्षीय तरुणाचे नाव आहे, धर्मेंद्र प्रताप सिंह. डोंगरे वसतिगृह मैदानावरील आनंदमेळ्यात तो सहभागी झाला असून, सर्वांचेच लक्ष वेधतोय. 

उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथील या तरुणाच्या उंचीमुळे त्याच्या विक्रमाची नोंद गीनिज बुकमध्ये झाली. सामान्यात असामान्य असे या व्यक्‍तीला एरवी फिरताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. म्हणूनच पोटाची खळगी भरण्यासाठी तो प्रदर्शनांचा आसरा घेतोय. सध्या डोंगरे वसतिगृहावर भरलेल्या प्रदर्शनात तंबू लावत त्याने स्वत:च प्रदर्शन भरविले आहे. 

प्रवास करताना अन्‌ सामान्यांसारखे जीवन जगताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आगळेवेगळे जीवन जगत असल्याचेही नमूद केले. उंची असल्याचे फायदे आहेत अन्‌ तोटेदेखील. दोन्ही गोष्टींचा स्वीकार करत आनंददायी जीवन जगत असल्याचे त्याने "सकाळ'शी गप्पा मारताना सांगितले. 

शर्टसाठी दहा मीटर कापड अन्‌ वीस नंबरची चप्पल 

धर्मेंद्र प्रताप सिंह याला शर्ट शिवण्यासाठी तब्बल दहा मीटर कापड लागते. इतकेच नव्हे, तर वीस नंबरची चप्पल लागते. रेडिमेडमध्ये या गोष्टी मिळत नसल्याने व्यावसायिकांकडून विशेष वस्तू बनवून घ्याव्या लागत असल्याचेही त्याने सांगितले. 

Web Title: The tallest in the country