शिक्षक- शिक्षकेतरांचे वेतन "ऑफलाइन'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

नाशिक - शिक्षक- शिक्षकेतरांचे थकीत व नियमित वेतन ऑफलाइन पद्धतीने करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची मागणी सरकारने मान्य केली. जुलै 2018 पर्यंतचे वेतन ऑफलाइन पद्धतीने होईल, ही माहिती महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, की महामंडळाचे प्रवक्ते अनिकेत पाटील यांनी नशिक विभागातील कनिष्ठ महविद्यालयांतील 206 शिक्षकांची वैयक्तिक मान्यता सक्षम अधिकाऱ्यांनी 18 महिन्यांपासून देऊनही केवळ त्या शिक्षकांना "शालार्थ आयडी' मिळत नसल्याने ते दीड वर्षांपासून वेतनापासून वंचित होते. त्यांचे वेतन ऑफलाइन व्हावे यासाठी अनिकेत पाटील यांना सातत्याने पाठपुरावा केला होता. शेवटी आज उपसचिव चारुशीला चौधरी यांनी त्याबाबतचा आदेश दिला.

Web Title: teacher salary online offline