
जळगाव: दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झालीय. बोर्डाकडून कॉपीमुक्त मोहिम राबवली जात आहे. परीक्षा केंद्रांवर भरारी पथके धाड टाकयात. दरम्यान, संवेदनशील केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तरीही पेपर फुटीच्या आणि कॉपीचे प्रकार होत असल्याचं दिसतंय. जळगावमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यात एका रिक्षात बसून विद्यार्थी, दोन महिला आणि त्याचा शिक्षक कॉपी लिहिताना दिसत आहेत.