कमाल तापमानात चढ-उतार; उकाड्याने नाशिककर हैराण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नाशिक - गेल्या आठवड्यात यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेल्या कमाल तापमानानंतर अजूनही चढ-उतार कायम आहे. तर दुसरीकडे वातावरणातील उकाड्याने नाशिककर हैराण आहेत. आज नाशिकचे कमाल तापमान 37.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, येत्या काही दिवसांत पावसाची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, शहरात रोज दुपारनंतर पावसाचे ढगाळ वातावरण होते. गेल्या आठवड्यात शहराचे कमाल तापमान तिसऱ्यांदा 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. त्यामुळे शहरात उष्णतेची लाटच आली.

त्यानंतर कमाल तापमानात घसरण झाली असली तरी यात सातत्याने चढ-उतार होत आहे. कमाल तापमान सतत 35 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. त्यामुळे वातावरणात प्रतिकूलता निर्माण होऊन त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. रात्रीच्या उकाड्यात वाढ होत असून, त्यामुळे नाशिककर हैराण आहेत.

कमाल तापमात अंश सेल्सिअसमध्ये :
18 मे : 37.8 अंश सेल्सिअस
17 मे : 36.9
16 मे : 37.4
15 मे : 36.2
14 मे : 36.5
13 मे : 40.0
12 मे : 41.2
11 मे : 39.3
10 मे : 39.1

Web Title: temperature increase in nashik