पोलिस मुख्यालय वसाहतीत ठेवले भाडेकरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नाशिक - पोलिस मुख्यालयाच्या वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या रहिवासासाठीची खोली बाहेरील व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिल्याबद्दल हवालदार सुनील भारती व दत्तात्रय पगार या पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे. आज न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

नाशिक - पोलिस मुख्यालयाच्या वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या रहिवासासाठीची खोली बाहेरील व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिल्याबद्दल हवालदार सुनील भारती व दत्तात्रय पगार या पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे. आज न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आयुक्तालयाच्या प्रशासन विभागातील राखीव पोलिस निरीक्षक नंदकिशोर इथापे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस मुख्यालयामध्ये कार्यरत असलेले हवालदार सुनील गोटू भारती, पोलिस नाईक दत्तात्रय साहेबराव पगार यांची पोलिस मुख्यालयातील वसाहतीमधील कर्मचाऱ्यांच्या खोल्यांची देखभाल व समस्या सोडविण्यासाठीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आली होती. पोलिस वसाहतीतील खोल्या या फक्त पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांनाच राहण्यासाठी देणे बंधनकारक असते. मात्र, संशयित भारती व पगार यांनी वसाहतीतील जुन्या इमारत क्रमांक 3 मधील 27 नंबरची खोली ही राहण्यास सुस्थितीत नसताना पोलिस खात्याबाहेरील व्यक्ती सतीश पुंडलिक बच्छाव, रूपेश बाळासाहेब निकम, सूरजितसिंग मिस्त्री यांना 2200 रुपये महिन्याने भाडेतत्त्वावर दिली होती. तिघेही या खोलीत गेल्या दीड वर्षापासून राहत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर या प्रकरणी सत्यता पडताळून पाहिल्यानंतर सोमवारी रात्री दोघांविरोधात सरकारवाडा पोलिसांत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला व अटक करण्यात आली.

संशयित भारती व पगार यांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणी पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये दोघांना पोलिस खात्यातून निलंबित केले आहे.

निलंबनाची दुसरी घटना
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल हे पोलिस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत असताना, दुसरीकडे पोलिस कर्मचारीच गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये आढळून येत आहेत. या महिन्यात चार पोलिस कर्मचाऱ्यांचे याच कारणातून निलंबित करण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याच्या अपहार प्रकरणात पोलिस आयुक्तालयातील सायबर शाखेतील प्रदीप ठाकरे व सागर निकुंभ या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ते अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या दोघांनाही पोलिस खात्यातून निलंबित केले 

Web Title: Tenant area police headquarters