Buldhana Crime News : कमी किंमतीत सोने देतो म्हणत महिला शिक्षिकेची साडे नऊ लाखांनी फसवणूक

भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधून कमी किंमतीत सोने देतो म्हणत धाराशिव जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेला साडे नऊ लाखांनी फासवल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील जऊळका शिवारात घडली आहे.
Buldhana Crime News
Buldhana Crime Newssakal

सिंदखेड राजा : भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधून कमी किंमतीत सोने देतो म्हणत धाराशिव जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेला साडे नऊ लाखांनी फासवल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील जऊळका शिवारात घडली आहे. या प्रकरणी किनगाव राजा ता.सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शिक्षिका असलेल्या उषाबाई विठोबा झाकडे, वय ४५ वर्षे ह्या सिद्धार्थ नगर,अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथे राहतात. त्यांच्याशी एका भामट्याने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत, आपल्याकडे सोने असून गरजेपोटी ते कमी किंमतीत विकायचे आहे, असे म्हटले.त्यानंतर कमी प्रमाणातील सोन्याची चाचणी केली असता ते खरे व शुद्ध असल्याचे निदर्शनास आले.

Buldhana Crime News
Buldhana News : हरभरा खरेदीसाठी यंदा नाफेड ची अद्याप प्रक्रीया नाही; खेडा खरेदीत शेतकऱ्यांची केली जाते गळचेपी

त्यानंतर उर्वरित सोने दुसरबीड ते लोणार मार्गावर असलेल्या जऊळका शिवारातील वन विभागाच्या जंगलात देण्याचे ठरले.त्यानुसार तारीख २८ मार्च सकाळी शिक्षिका उषाबाई झाकडे व सोने देणारे तिघे आरोपी जंगलात गेले. तिथे ९ लाख ५० हजार रुपये रोख घेऊन २ किलो सोन्याची सांगून बनावट पिवळ्या धातूची नाणी शिक्षिकेच्या हवाली केली. त्यानंतर महिला शिक्षिकेने त्याची चाचणी केली असता, खरा प्रकार उघडकीस आला.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिला शिक्षिकेने किनगांव राजा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास किनगांव राजा पोलीस करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com