Dhule Crime: शिरपुरात दुकान फोडून लाखोंच्या तारेची चोरी; घटनाक्रम CCTV फुटेजमध्ये कैद

Shirpur: Sub-inspector Sandeep Murkute and constable Govind Koli while checking the prints on the glass of the rack in the shop.
Shirpur: Sub-inspector Sandeep Murkute and constable Govind Koli while checking the prints on the glass of the rack in the shop.esakal

शिरपूर : शहरातील महाराजा कॉम्प्लेक्समधील इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेचे बंडल चोरून नेले. ही घरफोडी रात्री सव्वादोन ते पावणेतीनच्या दरम्यान झाली.

चोरट्यांनी प्रवासी कारचा वापर चोरीचे साहित्य वाहून नेण्यासाठी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आले. (Theft of lakhs of wire by breaking into shop in Shirpur incident captured on CCTV footage Dhule Crime)

महाराजा कॉम्प्लेक्सच्या पहिल्या रांगेत वर्धमान ट्रेडिंग कंपनी नामक इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी (ता. ३) दुकानमालक अतुल हसमुखलाल जैन (वय ५६, रा. जैन गल्ली, शिरपूर) रात्री नेहमीप्रमाणे दुकान कुलूपबंद करून घरी गेले. बुधवारी (ता. ४) सकाळी शेजाऱ्यांना दुकानाला कुलूप नसल्याचे आढळले.

त्यांनी जैन यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. ते तातडीने दुकानावर पोचले. दुकानाची पाहणी केल्यानंतर दुकानाच्या रॅकसह मागील छोट्या गुदामातून तांब्याची तार गुंडाळलेले सुमारे ३६ बंडल चोरीस गेल्याचे आढळले. त्यांनी सूचित केल्याने पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हवालदार गोविंद कोळी व शोधपथकाचे कर्मचारी येऊन पोचले. त्यांनी दुकानाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

चोरीपूर्वी रेकी

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर चोरीसंदर्भातील अनेक गोष्टी उघडकीस आल्या. मध्यरात्री सव्वादोन ते पावणेतीन या कालावधीत संशयितांनी चोरी उरकल्याचे दिसून आले. संशयितांनी प्रवासी वाहतुकीची कार आणून थेट पायऱ्यांजवळ उभी केली. झटपट दिवा लावला. चोरायचा मुद्देमाल कुठे आहे हे ठाऊक असल्याप्रमाणे जलद हालचाली करून संशयितांनी हा गुन्हा केला. त्यामुळे चोरीपूर्वी चोरट्यांनी अनेकदा रेकी केली असावी असा संशय आहे.

Shirpur: Sub-inspector Sandeep Murkute and constable Govind Koli while checking the prints on the glass of the rack in the shop.
Nashik Crime: मनमाडला घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार! 7 लाखाचा मुद्देमाल जप्त

श्वानपथक पाचारण

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर तासाभराने श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांनी दुकानातून थेट वाहनातच माल भरून पोबारा केल्याने श्वान समाधानकारक माग दाखवू शकला नाही. पोलिसांनी महाराजा कॉम्प्लेक्सच्या कोपऱ्यावर असलेल्या दुकानांसह रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील सीसीटीव्ही फुटेज मिळवून कारचा शोध लावण्याचा प्रयत्न चालविला आहे.

मेन रोड किंवा अन्य सोयीच्या जागा टाळून महाराजा कॉम्प्लेक्सच्या आतील भागात असलेल्या दुकानाची निवड करून चोरट्यांनी कार्यभाग उरकल्याने सराईत गुन्हेगारांचे ते कृत्य मानले जात आहे. याबाबत उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या घटनेत सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा संशय आहे.

कुलपेही नेली

संशयित घरफोडी करून कुलूप जागीच फेकून देत असल्याचा पोलिसांचा अनुभव आहे. मात्र वर्धमान ट्रेडिंग फोडल्यानंतर चोरट्यांनी कुलूपही सोबत नेले. दुकानात दिव्यांची स्विच कुठे आहेत, कॉपर वायरचे बंडल कुठे ठेवले आहे हे चोरट्यांना नेमके ठाऊक होते. इतकेच नव्हे, कार उभी करताना जेथे दिव्यांचा प्रकाश पोचत नाही अशी जागाही चोरट्यांनी हेरून ठेवल्याचे दिसून आले.

Shirpur: Sub-inspector Sandeep Murkute and constable Govind Koli while checking the prints on the glass of the rack in the shop.
Nashik News : मालेगावचे दुय्यम निबंधक व्ही. एम. माडे यांची चौकशी सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com