ऐन उन्हाळ्यात भाजीपाल्याला कवडीमोल भाव; भाजीपाला उत्पादक शेतकरी देशोधडीला 

रोशन भामरे 
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी घेतलेल्या सर्वच पिकांचे बाजारभाव घसरले आहेत. या पिकांत गुंतविलेले लाखो रुपयांचे भांडवल अंगावर पडल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत.

तळवाडे दिगर - कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले असून, सध्या एप्रिल महिना सुरु असून सूर्य आग ओकत आहे तरीही थोड्याफार पाण्यावर शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यापासून सर्व भाजीपाला पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत असून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च देखील निघत नसून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात मेंढ्या,बकऱ्या सोडल्या तर कोणी उपडून फेकले तर कोणी ट्राकटर फिरवले मात्र अद्यापही कोणत्याही भाजीपाला 3 ते 4 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून खर्च निघणेही अवघड झाले आहे.

उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी घेतलेल्या सर्वच पिकांचे बाजारभाव घसरले आहेत. या पिकांत गुंतविलेले लाखो रुपयांचे भांडवल अंगावर पडल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत. सध्या टोमॅटो, मिरची, कांदाकलिंगड, कोबी, फ्लॉवर, गिलके दोडके, काकडी, वांगे आदी या भांडवली पिकांमध्ये ऐन उन्हळ्यात शेळ्या मेंढ्या चारताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असून काही ठिकाणी आपल्याकडे असलेल्या थोड्याफार पाण्यावर शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली.मात्र पिक पिकून आल्यावर बाजारभावाने मात्र शेतकऱ्यांना निराश केले आहे. सध्या एकही शेतमालाला समाधानकार भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे सर्वच पिकांना एकरी जवळपास लाख रुपयांचे भांडवल गुंतविले आहे.

सध्या टोमॅटो, मिरची, कलिंगड, कोबी, गाजर, फ्लॉवर, गिलके दोडके, काकडी, वांगे आदी पिकांना 3 ते 5 रूपये एवढा चिल्लरचा भाव मिळत असून तोच माल शहरी भागात हात विक्रीसाठी 15  ते 20 रुपये किलो दराने विकला जातो मात्र शेतकऱ्यांकडून खरेदी करताना मात्र कवडीमोल दराने खरेदी करत असते. परिणामी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

सध्या सर्वच भाजीपाला पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत असून सर्व पिकांना लागवडीपासून ते पिक तयार होते तोपर्यंत एकरी लाख रुपये खर्च करावा लागत असून पिक निघाल्यावर ते बाजार समिती पर्यंत नेण्याचा खर्च ही निघत नसल्यामुळे शेतात लागवड करावी तरी कोणत्या पिकाची असा प्रश्न शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is no prize for the vegetables in summer