Dhule News : धुळ्यात एकाच रात्री 2 ठिकाणी घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

Dhule News : धुळ्यात एकाच रात्री 2 ठिकाणी घरफोडी

धुळे : शहरातील शिवाजीनगरात चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी केली. एका घरातून दहा हजारांचा, तर दुसऱ्या घरातून सोने-चांदीचे दागिने, असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला. (Thieves broke into 2 houses in 1 night About 1 lakh worth of goods were looted dhule crime news)

शिवाजीनगरातील जावीद सलीम खाटीक (रा. हनुमान मंदिरामागे) कुटुंबासह सुरत येथे लग्नासाठी गेले होते. बुधवारी (ता. १) सकाळी सहाच्या सुमारास घरी आले, तेव्हा घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी घरातून मोबाईल व पितळी भांडे, असा वीस हजारांचा ऐवज लंपास केला.

तसेच अमीन शेख उस्मान यांचे घर चोरट्यांनी फोडले. पुढील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पितळी भांडे, एक तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दहा हजारांची चांदी असा ऐवज चोरून नेला. तथापि, अमिन शेख उस्मान यांनी त्यांच्या घराचे बांधकाम असल्याने घर भाड्याने घेतले आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

त्यांचे साहित्य येथे होते. बुधवारी सकाळी नळाला पाणी आल्यानंतर ते पाण्याची टाकी घेण्यासाठी गेले असता कुलूप तुटलेले दिसले. याबाबत माहिती मिळताच आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Dhulerobbery