गुजर समाजाचा सामूहिक विवाहात तेरा जोडपे विवाह बंधनात 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

शहादा: महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्याचा सीमावर्ती भागात स्थिरावलेल्या गुजर समाजातील १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा मनरद (ता. शहादा) येथे थाटामाटात, शिस्तबद्धरीत्या हजारो समाजबांधवांचा उपस्थितीत पार पडला. वेळेवर व शिस्तबद्धरीत्या विवाह सोहळा हे समाजासाठी सर्वत्र कौतुकाचा आणि चर्चेचा विषय आहे. आजही या सोहळ्यात वेळेवर विवाह लावण्याच्या कटाक्ष संयोजकांनी पाडला. 

शहादा: महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्याचा सीमावर्ती भागात स्थिरावलेल्या गुजर समाजातील १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा मनरद (ता. शहादा) येथे थाटामाटात, शिस्तबद्धरीत्या हजारो समाजबांधवांचा उपस्थितीत पार पडला. वेळेवर व शिस्तबद्धरीत्या विवाह सोहळा हे समाजासाठी सर्वत्र कौतुकाचा आणि चर्चेचा विषय आहे. आजही या सोहळ्यात वेळेवर विवाह लावण्याच्या कटाक्ष संयोजकांनी पाडला. 

सकाळपासूनच या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरूनही मोठ्या प्रमाणावर समाजबांधव जमले होते. लग्नाचा मुहूर्त १०ः ५ मिनिटांचा होता. त्यामुळे सकाळी साडेनऊलाच नवरदेवाची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. लग्न मंडपात प्रत्येक जोडप्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ व त्याला क्रमांक देण्यात आला होता.त्यानुसार त्या त्या व्यासपीठावर वधू-वर विराजमान होऊन त्यांच्यासमोर त्याच वधू वरचे नातेवाइकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक जोडप्यांना विधीसाठी स्वतंत्र पुरोहित नेमण्यात आले होते. मंगलाष्टके मात्र सामूहिकपणे म्हणण्यात आले. नियोजित वेळेवर लग्न लावण्यात आले.

 नियम मोडल्याने तहसीलदार, पोलिसांच्या वाहनांवरही कारवाई​

समाज बांधवांमध्ये समाधान 

आजपर्यंत समाज बांधवांनी पाच लग्न सोहळे यशस्वीरीत्या पार पाडले. हा सहावा सामुदायिक विवाह सोहळाही आनंदमय वातावरणात झाला. सोहळ्यासाठी मनरद, करजई ,लांबोळा ग्रामस्थांनी स्वेच्छेने विडा उचलला होता. तो यशस्वी पार पडला. यासाठी तिन्ही गावातील नागरिक व महिलांचे त्यासोबतच समाज बांधव व भगिनींचे कार्य वाखाणण्याजोगे होते. लाखो रुपयांच्या खर्चाला फाटा देऊन एकाच मंचावर सर्व विवाह इच्छुकांचे विवाह पार पाडताना आपल्या रुढीला साजेल, असे सारे सोपस्कार पार पडल्याने सहभागी समाज बंधूंच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा झळकली होती.

घरी अंगणात केलेला विवाह आणि सामूहिकच्या व्यासपीठावर केलेला विवाह यात कुठलेही अंतर नाही. हे सर्वांना प्रकर्षाने जाणवले. यावेळी या सोहळ्यासाठी वस्तुरूपी व रोख स्वरूपात देणगी देणाऱ्या दात्यांची नावे लग्नमंडपात मोठ्या फलकावर लावण्यात आले होते .पुढे होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी समाज बांधवांनी या सोहळ्यामध्ये देणगीही दिली. 

पुढील वर्षी २१ फेब्रुवारीला सोहळा...... 

यावेळी समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच गुजर समाज मंचचा सामूहिक विवाह सोहळ्यातील उत्साह व प्रतिसाद पाहता पुढील वर्षीही २१ फेब्रुवारी २०२१ ला (प्रकाशा ता. शहादा) येथे मंचचा वतीने सामुदायिक विवाह सोहळा घेण्याचे जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी विविध शहर गुजर ग्राम मंडळाच्यावतीने ने यावर्षी २० एप्रिल २०२० ला प्रकाशा येथेच अन्नपूर्णा मंदिराचा प्रांगणात समाजाचा यंदाचा दुसरा विवाह सोहळा होणार आहे. त्यात अधिकाधिक समाज बांधवांनी वधू-वरांची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले. 
हरी पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.एस. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य आय.डी. पाटील, प्रा. डी. सी .पाटील , श्रीपत पटेल यांनी आभार मानले. 

वृक्षारोपण..... 

या विवाह समारंभात १३ जोडपे विवाहाबद्दल झालेत या सोहळ्यात सुरत येथील जगदीश भाई पटेल यांनी वधू वरांना मोफत रोपट्यांचे वाटप केले.जवळच असलेल्या लाभदायक माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात वधूवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी संगोपनाची जबाबदारी घेतली. 

पाडळसरे, शेळगाव बॅरेजसह अन्य प्रकल्प पूर्ण करणार: मुख्यमंत्री

भगवद्गीता भेट 

विवाहबद्ध झालेल्या प्रत्येक जोडप्याला सुभाष शंकर पाटील डामरखेडेकर (हल्ली मुक्काम वेळदा) यांनी भगवद्गीता भेट दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen couples married in a communal marriage of Gujar community