अंकाईटंकाई किल्ल्यावर 30 हजार बियांचे बीजारोपण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

झाड हा शब्द लिहून मी थांबलो, अन् झाड नसते तर उतरली असती का कविता अंतर्मनातून कागदावर..! या मोमीन यांच्या कवितेने ही मैफिलीची सुरवात झाली. अन् उतरोतर यात अधिक रंगत भरली. यावेळी किल्यावर रेंट्री, रावळ बाभूळ, सीताफळ, करंज, कांचन, काशिद, शिरस या सात जंगली जातीच्या ३० हजार बियांचे बीजारोपण करण्यात आले.

येवला : मोकळी वाटती झाडे, शिशिरात ढाळूनी पाने,
पाळून मुळाशी बसली आहेत उद्याची स्वप्ने!
कवी खलील मोमीन यांच्या या व इतर कवींच्या निसर्ग कवितांनी हिरवा शालू परिधान केलेला अनकाई किल्ला देखील शहारून आला. अन् पावसाच्या सरीत रंगलेल्या काव्य मैफीलीने बीजारोपणाला रंगत भरली.

यासाठी निमित्त ठरले ते विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा व मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनावणे जुनियर कॉलेज, अंदरसूल यांच्या संयुक्त विद्यमाने अंकाईटंकाई किल्ल्यावर ३० हजार बियांचे बीजारोपण करण्याचे.

झाड हा शब्द लिहून मी थांबलो, अन् झाड नसते तर उतरली असती का कविता अंतर्मनातून कागदावर..! या मोमीन यांच्या कवितेने ही मैफिलीची सुरवात झाली. अन् उतरोतर यात अधिक रंगत भरली. यावेळी किल्यावर रेंट्री, रावळ बाभूळ, सीताफळ, करंज, कांचन, काशिद, शिरस या सात जंगली जातीच्या ३० हजार बियांचे बीजारोपण करण्यात आले. बीजारोपणानंतर विद्यार्थ्यांसाठी कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनात मनमाडचे कवी खालील मोमीन, सिने अभिनेते संतोष परदेशी, महेश शेटे, मुजम्मील चौधरी, शालिनी वालतुरे यांनी आपल्या रचना सादर केल्या.

बीजारोपण अभियानात सोनवणे जुनियर कॉलेजच्या २३५ मुले-मुली, १५ शिक्षक, सावलीचे २५ स्वयंसेवक सहभागी झालेले होते. प्रास्तविक प्राचार्य सचिन सोनावणे यांनी केले.पंकज मढवई, मुकुंद अहिरे, मछीन्द्र काळे, अनिल निकम, सतीश बागुल, द्यानेश्वर निकम, परसराम शेटे, कविता गायकवाड, अक्षय खैरणार, संतोष सोनवणे यांनी संयोजन केले. संदीप बोढरे यांनी आभार व्यक्त केले.

Web Title: Thirty thousand seeding at ankaitikai fort at yevla