भुजबळांच्या समर्थनार्थ बैठकांना हजारो समर्थक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

नाशिक - बहुजन समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ 3 ऑक्‍टोबरला निघणाऱ्या विराट मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाभरात सुरू असलेल्या बैठकांना हजारोंच्या संख्येने समर्थक सहभागी होत आहेत. भुजबळांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे समर्थकांमध्ये असलेला असंतोष उफाळत चालला आहे.

नाशिक - बहुजन समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ 3 ऑक्‍टोबरला निघणाऱ्या विराट मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाभरात सुरू असलेल्या बैठकांना हजारोंच्या संख्येने समर्थक सहभागी होत आहेत. भुजबळांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे समर्थकांमध्ये असलेला असंतोष उफाळत चालला आहे.

आज बाळासाहेब कर्डक व दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत, पालखेड, चांदवड, मालेगाव, नांदगाव आणि येवला येथे नियोजन बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये समर्थकांनी आपापल्या गावातील विराट मोर्चा संदर्भातील सर्व जबाबदारी स्वयंस्फूर्तीने स्वीकारली असून, मदतीचा ओघदेखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोर्चाच्या नियोजनासंदर्भात सर्व समर्थकांना विविध सूचना देण्यात येत असून, मोर्चाची रूपरेषा स्पष्ट करून दिली जात आहे.

पिंपळगाव येथील बैठकीत सुरेश खोडे, तालुकाध्यक्ष विलास बोरस्ते, हरिश्‍चंद्र भवर, बाळासाहेब पुंड, नवनाथ मंडलिक, बाळासाहेब बनकर, मोतीराम पवार, कांतीभाई पटेल, संतोष गांगुडे, अश्‍पाक शेख, बाळासाहेब दुसाने, राजेंद्र खोडे, पंडित आहेर, सोनुपंत आहेर, मनोज संसारे, अंबादास जोंधळे आदी सहभागी झाले. पालखेडच्या बैठकीत विष्णू आहेर, सतीश गौराले, धनंजय महाले, अर्जुन जाधव, तुषार आहेर, चिंधू जाधव, सुरेश हिरे, रावसाहेब शेळके, राजेंद्र खैरे, बाबासाहेब शिंदे, अशोक आहेर, कचू जगझाप, मोतीराम आहेर, धर्माजी गिते, अरुण चव्हाण, फकीरराव जाधव, दत्तात्रय आहेर, श्रीकांत हिरे आदी भुजबळ समर्थक उपस्थित होते.

चांदवडच्या बैठकीत डॉ. सयाजीराव गायकवाड, उत्तम आहेर, सुनील कबाडे, डॉ. अरुण निकम, सुनील शेलार, रघुनाथ आहेर, तुकाराम निकम, उमेश केदारे, नंदू मंडलिक, भाऊसाहेब शेलार, देवीदास शेलार, तर मालेगावच्या बैठकीत धर्मा भामरे, बाळासाहेब बागूल, नरेंद्र सोनवणे, दीपक शेलार, प्रेम माळी, नगरसेवक गुलाब पगार, विनोद वाघ, यशपाल बागूल, कपिल डांगचे, सचिन सूर्यवंशी, दादा सोनवणे, अमोल शेवाळे, श्रावण श्‍यामराव वडगे, महेंद्र वडगे, राजू जाधव आदी समर्थक उपस्थित होते.

नांदगावला संतोष गुप्ता, अरुण पाटील, साहेबराव पाटील, शिवाजी पाटील, विजय इप्पर, आप्पा चकोर, डॉ. वाय. पी. जाधव, विष्णू निकम, भास्कर कदम, इंदू बनकर, इकबाल शेख, विजय पाटील उपस्थित होते.

Web Title: Thousands of supporters of the meeting in support of Bhujbal