दोन मोबाईल, चार दुचाकीचोरीसह शहरात तीन घरफोडीच्या घटना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नाशिक  - शहर व परिसरामध्ये दोन मोबाईलसह चार दुचाकी, एक बुलेट, सायकल चोरीला गेली. एकाच सोसायटीतील तीन घरफोड्यांतून चोरट्यांनी 80 हजारांचा मुद्देमाल नेला. त्यामुळे शहरात पोलिस आहेत की नाहीत, असा सवाल उपस्थित होतो आहे. 

नाशिक  - शहर व परिसरामध्ये दोन मोबाईलसह चार दुचाकी, एक बुलेट, सायकल चोरीला गेली. एकाच सोसायटीतील तीन घरफोड्यांतून चोरट्यांनी 80 हजारांचा मुद्देमाल नेला. त्यामुळे शहरात पोलिस आहेत की नाहीत, असा सवाल उपस्थित होतो आहे. 

उपनगर परिसरातील जय भवानी रोडवरील थोरातनगर येथील सुमंगल अपार्टमेंटमध्ये दोन संशयितांनी तीन फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून 79 हजारांचा ऐवज नेला. सुनील होनराव (रा. फ्लॅट क्रमांक 6) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित राजेंद्र भोसले (वय 25), किशोर वायाळ (दोघे रा. पेनसांगवी, पो. मंगरूळ, ता. चिखली, जि. बुलडाणा) यांनी मंगळवारी (ता. 14) संदीप पुनिया यांच्या घरातून 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल, मनोहर कनोजिया यांच्या घरातून 23 हजार 500 रुपये व सुनील होनराव यांच्या घरातून 11 हजारांचा मुद्देमाल असा एकूण 79 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित राजेंद्र भोसले याला अटक केली. 

झुलेखा शेख (रा. मुल्तानपुरा, वडाळा रोड) यांच्या हातातून पाच हजारांचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने हिसकावून नेला, तर विष्णू सिंगाण (रा. राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका) यांची पाच हजारांची सायकल घराजवळून चोरीला गेली. 

आरती भारुका (रा. वेदास स्पेसेस, गोविंदनगर) यांची 25 हजारांची ऍक्‍टिव्हा (एमएच 20, डीएम 2582) मंगळवारी कॉलेज रोडवरील बर्गर किंग शॉपसमोरून चोरट्याने लांबविली. जैनुद्दीन पठाण (रा. साईलीला अपार्टमेंट, खोडेनगर) यांची 80 हजारांची बुलेट (एमएच15, जीडी 92) अपार्टमेंटच्या पार्किंगमधून रविवारी (ता. 12) चोरून नेली. दत्तात्रय कुलकर्णी (रा. कैलासपती हौसिंग सोसायटी, नाशिक रोड) यांची दहा हजारांची दुचाकी (एमएच 15, एएफ 2575) रविवारी (ता. 12) अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीस गेली. रितेश गांगुर्डे (रा. सोमेश्‍वर कॉलनी, सातपूर) यांची 20 हजारांची दुचाकी (एमएच 15, सीयू 5837) 29 जुलैला मध्यरात्री पार्किंगमधून चोरीला गेली. गुरुमुखसिंग हुंदल (रा. आडगाव नाका) यांची 35 हजारांची ऍक्‍सेस (एमएच 15, जीके 4135) शनिवारी (ता. 11) मध्यरात्री पार्किंगमधून चोरीला गेली. 

Web Title: Three burglary incidents in the nashik city