एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

Farmer-Suicide
Farmer-Suicide

मालेगाव - नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. त्यातूनच शुक्रवार हा मालेगाव तालुक्‍यासाठी घातवार ठरला. तालुक्‍यातील तीन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने जिल्हा हादरला आहे.

कांद्याला कोंब फुटल्याने कांदा विकला जाणार नाही, विकला तरी भाव मिळणार नाही. त्यामुळे कर्ज फेडणे अशक्‍य होईल, या विवंचनेत असलेले ज्ञानेश्‍वर शिवणकर यांनी सकाळी कांद्याच्या ढिगाऱ्यावरच विष प्राशन करून आत्महत्या केली. 

दुसऱ्या घटनेत नांदगाव खुर्द येथील चेतन बच्छाव या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे निश्‍चित कारण मात्र समजू शकले नाही. 

सायने येथील वसंत सोनवणे यांनी कर्जाचा डोंगर असल्याने गुरुवारी (ता. १७) रात्री विषारी औषध प्राशन केले. उपचार सुरू असतानाच आज दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. यांच्यावर सुमारे पाच लाख रुपयांचे कर्ज होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com