मालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

प्रमोद सावंत
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव तालुक्यासाठी शुक्रवार घातवार ठरला आहे.

मालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव तालुक्यासाठी शुक्रवार घातवार ठरला आहे.

कांद्याला कोंब फुटल्याने व भाव नसल्याने कांद्याच्या ढिगावरच (शिर) विषप्राशन करून ज्ञानेश्वर शिवणकर (वय ३५, कंधाने) यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर पन्नास हजारांहून अधिक कर्ज होते. तीन भावांचे एकत्रित कुटुंब. दोन मुले, दोन मुली, आई-वडील असा परिवार असल्याने पाच एकर एकत्रित शेतीत ओढाताण होत होती. कांद्याला भाव नसल्याने शेतातच होता. रचलेल्या कांद्याला कोंब फटल्याने परिवार त्रस्त झाला. भाव नसल्याने कर्जाची चिंता वाढल्याने आत्महत्या केली असावी, असे ग्रामस्थांनी सांगितले. 

नांदगाव खुर्द येथील चेतन केदा बछाव (वय-२३) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चेतन अविवाहित होता. कळवण येथे मोलमजुरी करून गुजराण करीत होता. त्याच्या आई-वडीलांचे निधन झाले. मकर संक्रांतीसाठी गावी आला असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सायने येथील वसंत बंकट सोनवणे (वय ४५) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्यावर दीड लाख रूपये कर्ज असल्याचे समजते. शवविच्छेदन अहवालानंतर सविस्तर माहिती समजू शकणार आहे. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Three Farmers Suicides Including A Youth in Malegaon Taluka