"तुमच्या मुलीला फॅशन शो, फिल्मसध्ये काम देतो" फक्त एवढचं करा..

fake-friends.jpg
fake-friends.jpg

नाशिक : फॅशन शोमध्ये सहभागी करून घेत बक्षिसाचे व चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याची नोंद इंदिरानगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अनिल भुजंगराव चिंचोले (वय 55, रा. आदर्शनगर, जळगाव) यांना संशयित हर्षद सपकाळ याचा खुटवडनगरमध्ये सायबर कॅफेचा व्यवसाय आहे. हर्षदने जानेवारी 2017 ते मार्च 2019 यादरम्यान चिंचोले यांना फॅशन शो भरत असून, त्यामध्ये तुमच्या मुलीला फॅशन शोमध्ये भाग घेण्यास सांगा. तसेच त्यांना एक बक्षिसे असून, ते तुमच्या मुलीला मिळून देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी रजिस्ट्रेशन शुल्क लागणार असल्याचे सांगितले. 

फॅशन शोतील सहभागासाठी तीन लाखांची फसवणूक 

तुमच्या मुलीला चित्रपटात कलाकार म्हणून काम देतो. त्याचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेत असून, तिच्यासोबत जाण्यासाठी पालकांना विमानाचा खर्च व राहण्याचा खर्च द्यावा लागेल, असे सांगून विश्‍वास संपादन केला. वेळोवेळी दोन लाख 74 हजार रुपये ऍपद्वारे घेऊन फिर्यादीची फसवणूक करून पैशाचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com