विनयभंगप्रकरणी एैरला तीन वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

नाशिक : स्कूल व्हॅन अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आणि तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि 100 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. संजय उर्फ शेरसिंग करणसिंग एैर (वय 34, रा. अवतार पॉईंट सूर्य सोसायटी, बोरगड, म्हसरुळ) असे आरोपीचे नाव आहे. 

म्हसरूळ - दिंडोरी रस्त्यावरील वडनगरजवळ 14 सप्टेंबर 2017 ला ही घटना घडली होती. क. का. वाघ इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आरोपी संजय एैर मोबाईलवरून अश्‍लिल संदेश पाठवित होता. पीडित मुलीने मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. आरोपीने मोबाईल क्रमांक बदलून पुन्हा त्रास देणे सुरू केले. 14 सप्टेंबर 2017 ला सकाळी साडेदहाच्या सुमारास स्कूल व्हॅनचा आरोपीने पाठलाग केला आणि वडनगरला व्हॅन अडविली. तिचा विनयभंग करून पाण्याच्या बाटलीतील पाणी तिच्या तोंडावर फेकले होते. 'आज पाणी फेकले, उद्या अॅसिड फेकीन', अशी धमकी दिली. 

व्हॅनचालकाही धमकी दिली. याबाबत पीडित विद्यार्थिनी व तिच्या आईच्या फिर्यादीवरून म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल होता. उपनिरीक्षक के. बी. जोपळे यांनी तपास करून प्रधान न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर खटला दाखल केला. सरकारी पक्षातर्फे अॅड. शिरीष कडवे यांनी 7 साक्षीदार तपासले. त्यात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायधीश शिंदे यांनी आरोपीला 3 वर्षे सक्तमजुरी व दंड ठोठावला. न्यायालयीन पैरवी हवालदार एस. वाय. ढोले, एस.बी. गोडसे, एस. यू. गोसावी यांनी केली.

Web Title: For three years in the misconduct case