नोटाबंदीच्या निर्णयाने छंदावर पाणी सोडण्याची वेळ

मोठाभाऊ पगार - सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

देवळा - नोटाबंदीची झळ नोटा जमा करण्याच्या छंदाला बसल्याचा प्रकार येथे पाहावयास मिळाला. नोटेवर आकर्षक व विशिष्ट क्रमांक असला, की ती नोट संग्राह्य करणे असा हा छंद होता; परंतु चलनातील हजार, पाचशेच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे दहा वर्षांपासून आकर्षक नंबर असलेल्या हजार, पाचशेच्या नोटा बॅंकेत जमा करून छंदावर पाणी सोडण्याची वेळ देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर आहेर यांच्यावर आली.

देश भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाला आपण पाठिंबा देत असून, आपला छंद संपवीत आहोत, असे मयूर आहेर यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते मयूर आहेर यांनी दहा वर्षांपासून आकर्षक नंबर असलेल्या हजार, पाचशे, शंभरच्या नोटांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला होता. यात समान अंक असलेल्या काही नोटा होत्या, तर काही नोटांच्या शेवटी 786 असा अंक असलेल्या काही नोटा होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील हजार, पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणलेले असताना आपला छंद सोडण्याची वेळ मयूर आहेर यांच्यावर आली. आहेर यांनी आकर्षक नंबर असलेल्या अशा जवळपास 17 ते 18 हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला पाठिंबा दिला आहे.

Web Title: Time to leave the decision point on notabandi