टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लावर, कोथींबीरीला अडीच रुपये किलो दर

टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लावर, कोथींबीरीला अडीच रुपये किलो दर

तळवाडे दिगर(नाशिक) - कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्याला चालू वर्षी संपूर्ण उन्हळ्यात कवडीमोल दराने आपला भाजीपाला विकावा तीच परिस्थिती पावसाळ्यात देखील तशीच सुरु असून टोमॅटो, मिरची, कोबी, कोथिंबीरी यासर्वच सर्वच भाजीपाला पिकांना एक ते तीन रुपये प्रतिकिलो दर मिळत असून त्यात उत्पदान खर्च तर सोडाच पण मालाचा वाहतूक खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीस आले आहे.

टोमॅटो, मिरची, कोबी, कोथिंबीरी या भाजीपाला पिकांची गेल्या चार ते पाच महिन्यापासून दरात मोठी घसरण झाली असून उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, आत्ता तर चक्क भाजीपाला  बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यावर आली असून काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. आता १ ते ३ रुपये किलो इतका घसरल्याने उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे.

डांगसौदाणे येथील आबा गायकवाड या शेतकऱ्याने ९० (जाळी) क्यारेट टोमॅटो सुरत येथे पाठवला असता त्यांना १६८ रुपयांची पट्टी आली असून,टोमॅटो पिकासाठी एकरी एक लाख ते सव्वालाख रुपये खर्च करून हातात एक रुपया पण पडत नसून उलट घरातू पैसे घालण्याची वेळ उत्पादक शेतकरी वर्गावर आलेली आहे. तर वटार येथील जिभाऊ खैरनार या शेतकऱ्यांने तीस हजार रुपये खर्च करून उभ्या केलेल्या कोबीच्या पिकावर रोटर मारले आहे.

तळवाडे दिगर येथील एका शेतकऱ्याने ४९० किलो कोबी सुरत येथे विक्रीसाठी पाठविली असता तिला प्रतिकिलोला अडीच रुपये दर मिळाला असून ४९० किलो कोबी विक्रीतून २८२ रुपये हाती आले तर जोरण येथील देवा निकम या शेतकऱ्याची ४८० किलो मिरची विक्रीतून अवघे ३१० रुपये हाती आल्याने तीन-चार पहिने काबाडकष्ट करून एकरी लाखो रुपये खर्च करून उत्पादन खर्च निघणे देखील कठीण झाल्याने उत्पादक शेतकरी मात्र पुन्हा एकदा कर्जबाजारी होत आहे.

उन्हाळ्याभर आपल्याकडे असलेल्या थोड्याफार पाण्यावर पिकवलेल्या कांदा दोन पैसे मिळतील या आशेवर चाळीत साठवून ठेवला होता. मात्र ठेवलेला कांदा देखील पन्नास टक्के सडला असून दिवसेंदिवस कांद्याचे दर देखील कोसळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती दुष्काळात तेरावा महिना आशिगत बळीराजाची झाली आहे.

हाच भाजीपाला हाचभाजीपाला ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो शेतकऱ्यांकडून १ ते ३ रुपये प्रतिकिलोदराने खरेदी केलेला भाजीपाला मात्र शहरातील हातविक्री करताना मात्र ३० ते ३५ रुपयेया दराने विकला जातो. शेतकऱ्याला मात्र, खर्च तर सोडाच पण दोन मजुरांची मजुरीचे पैसे सुधा निघत नाही पण मात्र छोटे मोठे व्यापारी मात्र किलोमागो १० ते १५ रुपये कमवत असतात आणि बळीराजा मात्र काबाडकष्ट करून मरत आहे.

भाजीपाला फुकट रासायनिक खते व इंधनाच्या दारात वाढ शेतकऱ्याच्या भाजीपाल्यासह सर्वच शेतीमाल विक्रीतून नफा तर सोडाच पण मात्र उत्पादन खर्च देखील निघत नसताना सरकार मात्र रासायनिक खते तसेच इंधनाच्या दरात मात्र वाढ करत असून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मात्र मोठी वाढ होणार असून याचा शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असली तरी दीड लाखांच्या वरचे पैसे शेतकऱ्यांना भरावयाचे आहेत. मात्र कांदा, कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची फ्लावर मातीमोल भावाने विकली जात आहे. खर्च निघत नाही तर शेतकऱ्यांनी कर्जमुक्त होण्यासाठी भरावयाचे पैसे कोठून आणायचे असा प्रश्न पडला आहे. पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी कर्जमुक्त न होता उलट दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे.अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी आत्महत्या थांबतील का ?” -  केदा बापू काकुळते,प्रगतीशील शेतकरी,सरपंच आदर्श व स्मार्ट ग्राम किकवारी खुर्द

चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने सततच्या वातावरण बदलामुळे कोबी पिकावर करपा,आळी,पाकोळी,आदी रोगांचा प्रदुर्भाव देखील वाढला असून औषध फवारणीच्या खर्च देखील मोठी वाढ होत असून बाजारभाव मात्र कवडीमोल असल्यामुळे पिक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.”    
- संतोष बागुल, कोबी उत्पादक शेतकरी वटार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com