गिरणारेत टोमॅटोला एक रुपया भाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

नाशिक - लालजर्द, एक नंबरचे टोमॅटो अवघ्या एक रुपया किलोने विकण्याची वेळ गिरणारेत शुक्रवारी माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांवर आली. असे असतानाही व्यापाऱ्यांकडून "माल द्यायचा असेल तर 20 रुपये क्रेट या भावात द्या, जुना नोटा नसतील घ्यायच्या तर माल घरी घेऊन जा...' अशी अरेरावीची भाषा शेतकऱ्यांना ऐकविली गेली.

नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अखेरच्या टप्प्यात मंदीच्या कचाट्यात सापडला आहे. टोमॅटो एका क्रेटला दररोज खुडण्यासाठी 15 रुपये अन्‌ वाहतुकीला 10 रुपये खर्च येतो. याशिवाय इतर खर्च गृहीत धरला तर एका क्रेटमागे एकूण 70 रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो. मात्र आता शेतकऱ्यांच्या पदरात क्रेटला अवघा 20 रुपयांचा दर पडतोय. यामुळे बाजारात आणलेल्या टोमॅटोला क्रेटमागे 50 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शुक्रवारी दुपारी दोनपासून बाजारात टोमॅटोच्या वाहनांची गर्दी वाढत असताना तब्बल अडीच तास कोणताही व्यापारी माल खरेदी करण्यासाठी आलेला नव्हता. व्यवहार रखडले होते. उशिरा आलेल्या व्यापाऱ्यांनी अधिकच भाव पाडून मागणी केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. मात्र पर्याय नसल्याने मिळेल त्या भावात टोमॅटो विकण्याचाच पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारला.

Web Title: tomato one rupee rate in girnar