उत्पादन खर्चही निघत नसल्याने टोमॅटोचा वापर जनावरांना चाऱ्यांसाठी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

येवला : दोन महिन्यांपुर्वी टोमॅटो क्रेटला ५०० रुपयांपर्यंत दर होते. त्यावेळेस सर्वत्र टोमॅटोला मागणी होती तसेच निर्यातही सुरु होती. आता टोमॅटोची निर्यात बंद असून यामुळे क्रेटला दर्जेदार मालाला ५० तर दुय्यम मालाला १५ ते २० रुपयांचा दर मिळत असल्याने विक्री करण्याला देखील परवडत नसल्याची स्थिती आहे. यामुळे टोमटो जनावरांना टाकण्याची वेळ उत्पादकावर आली आहे.

टोमॅटोचे ग्राहक असलेल्या बांगलादेश, पाकिस्तान दुबईमध्ये निर्यात सुरु झाली तर टोमॅटोचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटो निर्यात खुली करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

भाज्यांचे भाव हे नीचांकी पातळीवर पोहोचले असून बाजारपेठेत मिळेल त्या भावाने पिकवलेला भाजीपाला विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहिला नाही. त्यात आता मोठ्या कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. बाजारात विक्रीस आणलेल्या टोमॅटोतून उत्पादन खर्च बाजूलाच पण काढणी व वाहतुकीचा देखील खर्च निघत नसल्याने  टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

द्राक्षबाग तोडून टाकल्यानंतर चागंले पैसे मिळतात म्हणून टोमॅटो लावले अन् भाव नसल्याने तेच टोमॅटो गुराढोरांना खावू घालण्याची वेळ पिंपरी येथील भगवान ठोंबरे यांच्यावर आली आहे. मजूरीचा खर्च वाहतूकीचा खरच हाच फिटत नसल्याने टोमॅटो फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे सर्वत्र दिसत आहे.

ठोंबरे यांनी द्राक्ष बाग काढून टोमॅटो लागवड केली, यासाठी तीन लाख खर्च केले. आच्छादन केले योग्य ड्रीपद्वारे पाणी दिले औषधे दिले. ज्यावेळेस टोमॅटो काढणीला आले त्यावेळेस टोमॅटोचे बाजारभाव अचानक कोसळले. ज्यावेळेस टोमॅटो लावले त्यावेळेस तीनशे ते चारशे रुपये प्रति क्रेटला भाव होते. नंतर साधारण २० किलोच्या क्रेटला ५० ते ६० च्या दरम्यान भाव जायला लागले. कधी २० रुपये विकले जायचे, त्यामुळे एक नंबरचेच जे टोमॅटो होते त्यांनाच तो भाव मिळतो जे दोन नंबरच्या प्रतीचे आहे त्यांना दहा रुपये पंधरा रुपये भाव मिळत असल्याने ते न्यायला पण परवडत नाही. नेण्याचा खर्च २० रुपये काढणीचा खर्च २० रुपये पडतोय त्यामुळे ते जागेवरच ५० रुपये कॅरेट पडतोय, त्यामुळे बाकीचे कॅरेट आम्ही गुरांना घालणे पसंत करतो अशी व्यथा ठोंबरे यांनी विशद केली.

सरकारने टोमटो बांगलादेश, पाकिस्तान,दुबईला एक्सपोर्टसाठी प्रयत्न करावा. जेणेकरून शेतकऱ्यांना १५० - २०० भाव कॅरेटला मिळेल. आम्ही तीन लाख खर्च करून आतापर्यत टोमॅटोचे आम्हाला ७०-८० हजार रुपये झाले आहे, हे नुकसान कसे भरून निघणार", असा सवाल शेतकरी भगवान ठोंबरे यांनी केला.

"मी आज येवल्यात टोमॅटो विक्रीला आणले मात्र ते भावाअभावी परत चालवला आहे. १५ रुपये कॅरेटला भाव मिळाला. यामुळे खर्च पण फिटत नाही. आता टोमटो फेकून देणार",  असे अनिस शेख यांनी सांगितले.

"तीन महिन्यापुर्वी टोमॅटोचे भाव सहाशे सातशे रुपये होते. त्यावेळेस देशावर मागणी होती व निर्यात खुली होती. आता टोमॅटोची निर्यात होत नाही त्यामुळे बाजार ५० रुपये झालेले आहेत, असे टोमॅटो व्यापारी दत्ता निकम यांनी सांगितले. 

Web Title: Tomato is used for animal feed due to non-production costs