"तू चेटूक करणारा भुताळा आहेस"..भुताटकीच्या संशयावरून 'त्याचा' छळ

andhshradha.jpg
andhshradha.jpg

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर परिसरातील बोंबीलटेक भागात चेटूक करणारा भुताळा असल्याच्या आरोपावरून त्रास दिला जात असल्याची तक्रार देवराम शिंदे यांनी केली आहे. त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,

असा व्हायचा छळ...

आंबोली शिवारातील बोंबीलटेक वाडीवर ते राहतात.वाडीवर काही लोक सतत आजारी पडतात. म्हणून वाडीवरील काही लोकांनी पेठ तालुक्‍यातील लिंगवणा येथील सीताबाई नावाची एक कथित भगत महिला बोलावली. त्या भगत महिलेने बोंबीलटेक येथे येऊन काही जादूटोण्याचे प्रयोग करीत, देवराम शिंदे यांचे नाव घेतले. शिदे चेटूक करीत असल्यामुळेच वाडीवर लोक आजारी पडतात, असे सांगितले. तेव्हापासून वाडीवरील काही कुटुंबीयांकडून शिंदे यांना त्रास सुरू आहे. 

सुख-शांतीसाठी गावाबाहेर जाण्याचा दबाव 
बोंबीलटेक गावातील लोकांच्या सुख-शांतीसाठी गावात राहू नये, यासाठी दबाव येत असल्याचा शिंदे यांचा आरोप आहे. या संदर्भात शिंदे यांनी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज केला आहे. भुताळा ठरवून गावातील लोकांकडून जिवाला धोका आहे. शिवीगाळ करीत मारझोडीची धमकी दिली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बोंबीलटेक गावातील लोकांच्या सुख-शांतीसाठी गावात राहू नये, यासाठी दबाव येत असल्याचा शिंदे यांचा आरोप आहे. या संदर्भात शिंदे यांनी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज केला आहे. भुताळा ठरवून गावातील लोकांकडून जीवाला धोका आहे. शिवीगाळ करीत मारझोडीची धमकी दिली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  

जुन्या परंपरा आणि विचारसरणीमुळे अंधश्रद्धेच्या प्रमाणात वाढ

श्रद्धा व अंधश्रद्धा यामध्ये जास्त फरक नसतो, एखादी गोष्ट आंधळेपणाने स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच अंधश्रद्धा फोफावणे. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. अंधश्रद्धेमुऴे निरपराध जीवांचे बळी जातात. काही ढोंगी लोकांमुळे ,अशिक्षितांमुळे व जुन्या परंपरा आणि विचारसरणीमुऴे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com