Dhule ZP Budget : एकूण 20 कोटी 5 लाखांचे अंदाजपत्रक सादर

Zilla Parishad Chairperson Ashwini Patil showing copies of the budget to the 2023-24 budget meeting of the ZP
Zilla Parishad Chairperson Ashwini Patil showing copies of the budget to the 2023-24 budget meeting of the ZPesakal

धुळे : जिल्हा परिषदेच्या २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात मागील वर्षापेक्षा सहा कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात कृषी विभागासाठी दीडपट, तर पशुसंवर्धन विभागासाठी दुप्पट निधीची तरतूद करण्यात आली.

एकूण २० कोटी पाच लाखांच्या या अंदाजपत्रकात १४ लाख ११ हजार रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे. ( Total budget of 20 crores 5 lakhs presented Dhule ZP Budget news)

धुळे जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी (ता. २४) जिल्हा परिषद सभागृहात झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा अश्‍विनी पाटील अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे सभापती देवेंद्र पाटील यांनी धुळे जिल्हा परिषदेचे २०२३-२४ चे अंदाजपत्रक सादर केले.

महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, समाजकल्याण सभापती कैलास पावरा, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, शिक्षण सभापती महावीरसिंह रावल, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्‍वरी एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण, दळणवळणासाठी दीड ते दुप्पट वाढ करण्यात आली. समाजकल्याण विभागासाठी दोन कोटी, महिला व बालकल्याण विभागासाठी ६९ लाख २५ हजार, पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीसाठी एक कोटी ३२ लाख, शाळा देखभाल-दुरुस्तीसाठी एक कोटी ४२ लाख ९० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Zilla Parishad Chairperson Ashwini Patil showing copies of the budget to the 2023-24 budget meeting of the ZP
Nashik News : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुरगाणा ग्रामीण क्रीडा मंडळ विजेता

दरम्यान, आरोग्य विभागासाठी मागील वर्षी एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद होती. यंदा ती एक कोटी ३१ लाख रुपये करण्यात आली. शिक्षण विभागासाठी एक कोटी ४२ लाख, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी एक कोटी ३२ लाख अशा तरतुदी करण्यात आल्या. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सहा कोटी रुपयांनी अंदाजपत्रकात वाढ झाली. मागील वर्षी अर्थात २०२२-२३ मध्ये १४ कोटी २० लाख पाच हजार रुपयांचे अंदाजपत्रक होते.

असे मिळणार उत्पन्न (लाखांत)

-सामान्य उपकर...४५.५९

-वाढीव उपकर...७९.००

-सापेक्ष अनुदान...६५.००

-मुद्रांक शुल्क...२०९.००

-व्यवसाय कर-०१.४२

-सेवा कर...२८.००

-एकूण...४२८.०४---

Zilla Parishad Chairperson Ashwini Patil showing copies of the budget to the 2023-24 budget meeting of the ZP
Bacchu Kadu | मंदिर-मस्जिद अन्‌ भोग्यांपेक्षा जनतेचे प्रश्‍न सोडवा : कडू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com