VIDEO : तो नाशिकमध्ये आला.. फिरला..अन् 'हा' पाहुणा म्हणतोय तरी काय?

carolis.png
carolis.png

नाशिक : नाताळ सणानिमित्त शाळांना असलेल्या सुट्टया त्यातच थर्टीफस्ट निमित्ताने अनेकांकडून सहकुटुंब पर्यटनाची संधी साधली जात आहे. देश-विदेश अन् महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातून पर्यटक नाशिकमध्ये दाखल होत आहे. नाशिकसह परिसरात हजारोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावण्याची शक्‍यता आहे. त्यातून कोट्यावधीची उलाढाल होणार आहे. पर्यटनामुळे येथील अर्थकारणालाही गती मिळणार असल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

"आय लव्ह नासिक"

युनायटेड किंगडम म्हणजेच परदेशातून आलेला पाहुणा कॅरोलिस जेडविसस हा सुध्दा नाशिकच्या इतक्या प्रेमात पडला की खास नाशिकमध्ये त्याने चक्क एक आठवड्यापासून मुक्काम ठोकला आहे.नेमका काय म्हणतोय कॅरोलिस?

थंड हवेचे ठिकाण,वाईन सिटी
नाशिक शहराला धार्मिक महत्त्व असल्याने या ठिकाणी सुट्टीच्या काळात नेहमीच पर्यटकांचा ओढा असतो. धार्मिक पर्यटनाबरोबरच, थंड हवेचे ठिकाण तसेच वाईन टुरीझम तसेच ऍग्री टुरिझमचीही जोड मिळत असल्याने पर्यटकांची पसंती नाशिकला मिळत आहे. महाराष्ट्रासह शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश यासह विविध राज्यातून पर्यटक नाशिकमध्ये दाखल होत आहे. पंचवटी परिसर, मुक्तीधाम, त्र्यंबकेश्‍वर, सप्तश्रृंगी, सापुतारा, वेरूळ, अजिंठा, शिर्डी हा सर्व परिसर पर्यटकांना आकर्षित करत असतो. नाताळच्या सुट्ट्यामुळे आजपासूनच पर्यटकांची गर्दी नाशिकसह शेजारच्या पर्यटनस्थळांवर दिसू लागल्याने हा भाग पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

गोदाकाठ...आवडीचे ठिकाण
 रविवारी (ता. २९) गोदाकाठावरील वाहनतळांवर वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्‍वर यासह इतर मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा होत्या. तपोवन परिसराकडे पर्यटकांची पावले आपोआप ओढली जातात. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे हॉटेल्स, पूजासाहित्य विक्रेते, रिक्षा, टॅक्‍सीसह इतर व्यवसायांना चालना मिळत आहे. बहुसंख्य पर्यटक हे स्वतःच्या वाहनाने येत आहेत. तर रेल्वे किंवा बसने आलेले पर्यटक रिक्षा तसेच टॅक्‍सीचा आधार घेत आहे. नाशिकमधील देवदर्शन आटोपल्यानंतर पर्यटक मांगीतुंगी, सापुतारा, वणी, शिर्डी, त्र्यंबकेश्‍वर या भागात जात असल्याचे चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com