Nandurbar Ganeshotsav : वडाळीत डीजे, गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक! एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम

Police Inspector Sandeep Patil, Subhash Sonawane, Girish Jagtap, Gajendra Gosavi, Kalpana Mohite, Himmat Sonawane playing Lazim in One Village One Ganpati procession.
Police Inspector Sandeep Patil, Subhash Sonawane, Girish Jagtap, Gajendra Gosavi, Kalpana Mohite, Himmat Sonawane playing Lazim in One Village One Ganpati procession.

Nandurbar Ganeshotsav : गेल्या अनेक वर्षांची एक गाव एक गणपती स्थापनेची परंपरा वडाळी (ता. शहादा) येथे आजही कायम असून, गावात एकोपा राखण्यास यामुळे मदत होते. तंटामुक्तीसाठीही फायदा होतो, खर्चात बचत होऊन विधायक कामासाठी त्या पैशाचा वापर होऊन, सामाजिक उपक्रम राबविता येतात.

विसर्जनप्रसंगी डीजे व गुलालाची उधळण न करता आकर्षक लेझीमनृत्य करत युवक व युवतींनी भगवे फेटे घालून विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. (tradition of one village and one Ganesha continues in vadali village nandurbar news)

पोलिस निरीक्षकांनीही धरला ठेका

एक गाव एक गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेऐवजी पारंपरिक वाद्य लावण्यात आले होते. यावर मंडळातील तरुण-तरुणी लयबद्ध लेझीम खेळत असतानाच पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी थेट मंडळाच्या युवक-युवतींसोबत लेझीमनृत्य सादर करून आनंद घेतला. त्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सोनवणे, पोलिसपाटील गजेंद्र गोसावी, पंचायत समितीचे माजी सदस्य गिरीश जगताप, माजी उपसरपंच हिंमत सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या कल्पना मोहिते यांनीही सहभाग घेतला.

महिला, युवतींचाही सहभाग

येथील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत विशेष म्हणजे गावातील युवतींनीही लेझीमनृत्य सादर करून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यामुळे गावासह परिसरात या आगळ्यावेगळ्या मिरवणुकीचे न्यू बजरंग माळीवाडा मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Police Inspector Sandeep Patil, Subhash Sonawane, Girish Jagtap, Gajendra Gosavi, Kalpana Mohite, Himmat Sonawane playing Lazim in One Village One Ganpati procession.
Nandurbar Ganeshotsav 2023 : उत्कृष्ट गणेशमंडळांचा होणार सन्मान; नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा निर्णय

गुलाल न उधळता भगवे फेटे

एक गाव एक गणपती मित्रमंडळाने गेला आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून विसर्जनप्रसंगी महिला, युवंतीसह मंडळाचे पदाधिकारी युवक व कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरांना भगवे, लाल, गुलाबी असे रंगीबेरंगी फेटे परिधान करूनच मिरवणुकीत सहभाग नोंदविला, तसेच गुलालाची उधळण न करता भक्तिसंगीत, धार्मिक गीतांवर नृत्य करत विसर्जन मिरवणूक पार पाडली.

वडाळी येथील न्यू बजरंग ग्रुप माळीवाडा येथील युवा-युवतींचा एक गाव एक गणपती विसर्जन सोहळा व लेझीम साहित्यवाटप सारंगखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष सोनवणे, वडाळी पंचायत समितीचे माजी सदस्य गिरीश जगताप, जिल्हा पोलिसपाटील संघाचे कार्याध्यक्ष तथा पोलिसपाटील गजेंद्र गोसावी, माजी उपसरपंच हिंमत सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या कल्पनाबाई मोहिते, पत्रकार दिनेश पाटील, गुलाब सोनवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा, आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली.

Police Inspector Sandeep Patil, Subhash Sonawane, Girish Jagtap, Gajendra Gosavi, Kalpana Mohite, Himmat Sonawane playing Lazim in One Village One Ganpati procession.
Nandurbar Ganeshotsav : तळोद्यात साकारला गवती चहा प्रकल्प..! गणेशमंडळाची सामाजिक बांधिलकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com