लग्नाच्या मुहूर्तांमुळे विंचूर-प्रकाशा महामार्गावर वाहतूक ठप्प

रोशन खैरनार
बुधवार, 25 एप्रिल 2018

सटाणा : आज बुधवार (ता.२५) रोजी दाट लग्न तिथी असल्याने सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर सकाळी 10 वाजेपासून सूर्या लॉन्स ते थेट मोरेनगर (ता.बागलाण) पर्यंत सहा किलोमीटर वाहतूक ठप्प झालेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

दाट लग्नतिथी असल्याने आज शहर व तालुक्यात शेकडो विवाह समारंभ आहेत.

लग्नांना जाण्यासाठी सकाळपासूनच नागरिक आपल्या वाहनासह घराबाहेर पडले होते. याचबरोबर कांदा विक्रीसाठी अनेक शेतकरी ट्रॅक्टरद्वारे आपला शेतमाल बाजार समितीमध्ये आणत होते. त्यात सकाळी 10 वाजता अवजड वाहतुकीमुळे विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका अनेक वाहनधारकांना बसला. शहरातील तापमान आज 42 अशांवर स्थिरावले होते. प्रचंड उष्णता व ठप्प वाहतुकीमुळे बसेस व खासगी प्रवासी वाहनांमधील प्रवाशी भाजून निघत होते. 

विंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांना जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या महामार्गावर दररोज हजारो अवजड वाहनांची ये - जा असते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. अवजड वाहतुकीमुळे हजारो निष्पाप जीवांचा बळी या महामार्गावर गेला आहे. 

शहराबाहेर पूर्व दिशेने वळण रस्ता तयार करून अवजड वाहतूक त्या मार्गे वळवावी, अशी मागणी शहरवासीय गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. 

या महामार्गाला नुकताच केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलेला आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही लवकर सुरू होणार असल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल, हे येणारा काळच ठरवेल. मात्र तोपर्यंत शासनाने एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची वाट बघू नये.

Web Title: Traffic Jam on vinchur prakasha highway