Nandurbar News : तळोद्यातील वाहतूक कोंडींने नागरिक हैराण; नियम धाब्यावर

Traffic jams in Taloda are disturbing citizens Nandurbar News
Traffic jams in Taloda are disturbing citizens Nandurbar Newsesakal

Nandurbar News : बेशिस्त वाहन पार्किंग, शहरातील मेन रोडवर मिळेल त्याजागेवर व्यवसाय करणारे लॉरीधारक व छोटे व्यावसायिक तसेच, दिवसेंदिवस वाढतच जाणारे अतिक्रमण यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. (Traffic jams in Taloda are disturbing citizens Nandurbar News)

यामुळे वाहनधारक व नागरिक हैराण झाले आहेत. वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक पोलिस तसेच, पालिका प्रशासनाने शिस्त मोडणारे व नियम धाब्यावर बसविण्यावर कारवाई करावी. स्वतंत्र हॉकर्स झोन तयार करावा व बायपास रस्त्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

तळोद्यातील वाहतूक मुख्यतः बस स्टॅन्डपासून स्मारक चौक मार्गे मेन रोड तेथून पुढे आनंद चौक मार्गे हातोडा रस्त्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर होत असते. या रस्त्यावर दररोज हजारोंच्या संख्येने वाहने ये - जा करीत असतात त्यात दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच बस व अवजड वाहनांचा देखील समावेश आहे. मात्र बस स्थानकापासून थेट काका शेठ गल्लीपर्यंतचा रस्ता पूर्वीपासूनच निमुळता आहे, पूर्वी वाहनांची संख्या मर्यादित असल्याने त्यावेळी या रस्त्यावर वाहतुकीची समस्या कमी होती.

मात्र गेल्या काही वर्षांत शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हातोडा पूल झाल्यानंतर आता या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ पहावयास मिळते. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी कच्चे व पक्के अतिक्रमण झाले असून रस्त्यावर जागोजागी हात गाडीवर व्यवसाय करणारे विक्रेते दिसून येतात. रस्त्याचा कडेला बसून देखील काही नागरिक व्यवसाय करतात.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Traffic jams in Taloda are disturbing citizens Nandurbar News
Nashik Crime News : चोरट्यांकडून महिलांच्या दागिन्यांची लुट; अडीच लाखांचे दागिने लंपास

या रस्त्यावरून दररोज मोठे वाहन विशेषतः बस ये-जा करतात, त्यावेळी हमखास वाहतूक ठप्प होत वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडतो. बऱ्याचदा वाहतुकीच्या कोंडीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन व अधिकाऱ्यांची वाहन देखील सापडल्याचा घटना घडतात. दरम्यान वाहनांना शहराबाहेरून येण्या-जाण्यासाठी बायपास रस्ते नसल्याने शहरातच वाहनांची गर्दी होते. त्यामुळे शहरातील या रस्त्याच्या श्वास अक्षरशः कोंडला जात आहे.

बायपास रस्त्यांसाठी पुढाकार घ्यावा

बसस्थानकाचा मागील बाजूने शहरातील एकमेव बायपास रस्ता जातो. मात्र सदर रस्त्याच्या दुतर्फा रहिवासी परिसर असून या रस्त्याची नेहमीच दुरवस्था असते. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी, नवीन प्रस्तावित बायपास लवकर पूर्ण व्हावेत अशी आशा शहरवासीयांची आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका प्रशासन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेले बायपास रस्त्यांचे घोगडे दूर करावे अशी रास्त अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Traffic jams in Taloda are disturbing citizens Nandurbar News
Dhule Water Scarcity : साक्री तालुक्यात पाणीटंचाईचे ढग; तयारी संभाव्य पाणीटंचाईची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com