आठवण रहावी म्हणून लग्नादिवशी वधु-वराचे वृक्षारोपण

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

वणी (नाशिक) : लग्न झाल्यानंतर सासरी गेलेल्या मुलीची आठवण कायम डोळ्यासमोर राहावी यासाठी लग्नाच्या दिवशीच वधु व वराच्या हस्ते वृक्षारोपण करुन  'माझी लेक'  म्हणून पालन पोषण करुन संवर्धन करण्याचा निर्णय साकोरेपाडा, ता. कळवण येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. गावच्या सरपंचाच्याच घरी लग्न असलेल्या वधु वराने वृक्षारोपण करुन आपली आठवण कुटुंबियांसमवेत राहाण्याबरोबरच पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. 

वणी - कळवण रस्त्यावरील साकोरेपाडा या आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थांनी प्रत्येक मुलीच्या नावाने झाड लावण्याचा निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी सरपंचाच्या घरातूनच करण्यात आली. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांचे पालण पोषन करुन लहाणाचे मोठे करतात. त्यात मुलगी वयात आल्यानंतर तीचा विवाह करुन दिला जातो. लाडा कोडात वाढलेली मुलगी विवाह झाल्यानंतर सासरी जाते. यावेळी आई वडीलांना तीची आठवण कायम आपल्या सोबत राहावी, त्याच बरोबर पर्यावरणाची निगा व समतोल राहावा या उद्देशाने मुलीच्या विवाहाच्या दिवशी वधु - वराच्या हस्ते वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धनाचा निर्णय साकोरेपाडा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

साकारे पाड्याचे पोलिस पाटील भरत चिमन गवळी यांनी ग्रामस्थांसमोर गावातील मुलीचा विवाह निमित्त वधु वराच्या हस्ते आठवण म्हणून मुलीच्या घरासमोर किंवा सुरक्षीत ठिकाणी वृक्षारोपन करण्याची संकल्पना मांडली त्यास गावातील ग्रामपंचायतीटे पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला आहे. आता साकारेपाड्यात होणाऱ्या प्रत्येक विवाहा सोहळया बरोबरच वृक्षारोपनाचाही कार्यक्रम संपन्न होणार आहे. वृक्षारोपन केलेल्या वृक्षाची आपल्या मुलीप्रमाणेच पालण पोषण व संवर्धनाची  जबाबदारी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरच ग्रामस्थही घेवून मुलीची आठवण कायम आपल्या डोळयासमोर राहाणार आहे.  

याची अमंलबजावणी साकोरेपाड्याचे सरपंच चंद्राबाई सागर बोरसे यांच्या नंनद व बेबीलाल बोरसे यांची कन्या ज्योती व सप्तश्रृंगी गड येथील चंदु गांगोडे यांचे चिरंजीव महेश यांच्या विवाहा निमित्ताने बुधवारी (ता. २५) होऊन वधु-वरांच्य् हस्ते वृक्षारोपन होवून करण्यात आली. यावेळी  प्रकाश जोशी, पंडीत कळमकर, बंडू देशमुख, श्रीराम कुलकर्णी, संदीप बेनके, पोलिस पाटील भरत गवळी आदींसह बोरसे व गांगोडे परीवरातील आप्तेष्ट व कुटुंबीय उपस्थित होते.

Web Title: tree plantation on marriage day by couple for remembrance