आदिवासींच्या विकासातील त्रुटी दूर करणार - सावरा

आदिवासींच्या विकासातील त्रुटी दूर करणार - सावरा

नाशिक - आदिवासी समाजाचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचाविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबवत आहोत. परंतु त्या तळगाळापर्यंत पोचत नाहीत, हीच मुख्य अडचण आहे. मात्र आदिवासी समाजाचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व प्रकारच्या त्रुटी दूर करून आदिवासी सेवक व संस्थांच्या सहभागातून चालना देणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले. 
आदिवासींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्याबद्दल आदिवासी सेवक व सेवा संस्था यांना महाकवी कालिदास कलामंदिरातील कार्यक्रमात पुरस्कारांद्वारे गौरविण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पेसा आणि वनहक्क जमिनीच्या कायद्याच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे प्रश्‍न सुटत आहेत. लाभार्थ्यांना आता थेट त्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करून त्यांचा विकास साधला जात आहे. आदिवासी समाजात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सूचना घेऊन त्यादृष्टीने आम्ही समाजाचा विकास साधणार असल्याचे सावरा यांनी स्पष्ट केले. 

पुरस्कारार्थी व्यक्ती 
प्रमोद गायकवाड (नाशिक), रमेश रावले (कळवण, नाशिक), बापूराव साळवे (कोपरगाव, नगर), डॉ. कांतिलाल टाटिया (शहदा, नंदुरबार), सरस्वती भोये (जव्हार, पालघर), लक्ष्मण डोके (जव्हार, पालघर), हरेश्‍वर वनगा (डहाणू, पालघर), मनोहर पादीर (पेण, रायगड), रामेश्‍वर नरे (महाड, रायगड), भगवान देशमुख (नांदेड), श्रीमती पौर्णिमा उपाध्ये (अचलपूर, अमरावती), सुनील देशपांडे (धारणी, अमरावती), सदाशिव घोटेकर (यवतमाळ), सुखदेव नवले (पैठण, औरंगाबाद), राजाराम सलामे (देवरी, गोंदिया), प्रमोद पिंपरे (गडचिरोली). 

पुरस्कारार्थी संस्था 
शाश्‍वत संस्था (मंचर, पुणे), विवेक रूरल डेव्हलपमेंटल सेंटर संचलित राष्ट्र सेवा समिती ग्रामविकास केंद्र (वसई, पालघर), डॉ. हेडगेवार सेवा समिती (नंदुरबार), आम्ही आमच्या आरोग्यासाठी (कुरखेडा, गडचिरोली), वनवासी कल्याण आश्रम (नाशिक), सुयश चॅरिटेबल ट्रस्ट (पुणे), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (मुळशी, पुणे). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com