अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न : आजीने नातीला वाचविले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

नांदगाव : तालुक्यातील दहेगाव येथे एकट्या अल्पवयीन मुलीला घरात गाठून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुन्ना पठाठे  (रा. दहेगाव) याच्या विरोधात नांदगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नांदगाव : तालुक्यातील दहेगाव येथे एकट्या अल्पवयीन मुलीला घरात गाठून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुन्ना पठाठे  (रा. दहेगाव) याच्या विरोधात नांदगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुलगी १२ वर्षाची असून तिची आई मोलमजुरीसाठी दुसरीकडे गेली होती. आजी शेजारी पडवीत बसलेली होती. शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाच्या सरीनी मक्याचे भूस ओले होईल म्हणून ते झाकण्यासाठी मुलगी गेली. नंतर पावसात कपडे ओले झाले म्हणून घरी येऊन, कपडे बदलवत असतांना मुन्ना गुपचूप घरात आला व तो पिडीतेचे तोंड दाबून अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असतांना मागून आलेल्या आजीने त्यास धरून ओढले. तेव्हा तिच्या हाताला झटका मारून तो पळून गेला. परंतु या झटापटीत आजीच्या हातातल्या बांगड्या फुटल्या. सायंकाळी आई आल्यानंतर काकाच्या मदतीने त्यांनी पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. तपास पोलीस हवालदार रमेश पवार करत आहेत. 

Web Title: trying to abuse little young girl : grandmother saved her granddaughter

टॅग्स