वाहन खरेदीसाठी उत्साह; चार कोटींची उलाढाल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नाशिक -  अक्षयतृतीयेनिमित्त बुधवारी (ता. 18) दुचाकी व चारचाकींच्या खरेदीचा मुहूर्त साधण्यात आला. वाहनांच्या दालनात सकाळी खरेदीचा उत्साह जाणवला. मात्र उन्हामुळे दुपारी शुकशुकाट होता. वाहन बाजारात चार कोटींपर्यंतची उलाढाल झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत काहींनी वाहनांची आगाऊ बुकिंग केली होती. हक्‍काचे वाहन घरी नेत विधिवत पूजन केले. वाहन कंपन्यांनीही कमी व्याजदरात कर्जपुरवठा, सोडतीद्वारे आकर्षक भेटवस्तू, वाढीव वॉरंटी, मोफत विमा अशा विविध योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या. चारचाकींच्या खरेदीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. यापुढे थेट गणेशोत्सवाचा हंगाम असल्याने प्रतीक्षा न करता वाहन खरेदीची लगबग ग्राहकांमध्ये बघायला मिळाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीमध्ये किरकोळ प्रमाणात घट झाली असल्याचे विक्रत्यांनी सांगितले. 

वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळी मुहूर्त साधला. दुपारनंतर फारशी गर्दी नव्हती. गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ खप कमी झाला असला तरी यंदाची अक्षयतृतीया ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी समाधानकारक राहिली. 
- सुशील गोयंका, विक्री व्यवस्थापक, जितेंद्र ऑटोमोबाईल्स. 

Web Title: Turnover of four crores akshay tritiya

टॅग्स