'ओटीपी'द्वारे सटाण्यात २५ हजारांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

सटाणा - मी बँकेचा मॅनेजर बोलतोय, असे सांगून तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मला द्या, असे सांगून खात्यातील २५ हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना सटाणा येथे घडली आहे. याबाबत सटाणा पोलिस ठाण्यात सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल कण्यात आला आहे.

बागलाण तालुक्यात सायबर क्राईमने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांनी धसका घेतला आहे. दरम्यान, तक्रारदार यांनी ओटीपी क्रमांक शेअर केल्याने त्यांची फसवणूक झाली असून ‘ओटीपी’ क्रमांक कोणालाही देवू नये, असे आवाहन सटाणा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील सयाजी महादू पाटील यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून, मी बँकेचा मॅनेजर बोलतोय, तुमचे पासबुक ऑनलाईन पाठवायचे आहे. त्यासाठी क्रेडीट कार्डची पडताळणी (व्हेरिफिकेशन) करायची आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर आता काही क्षणात मेसेज रुपात येणारा 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) मला लगेच सांगा. त्यामुळे तुमच्या क्रेडीट कार्डची पडताळणी होईल आणि तुमची सेवा अखंडित राहील, अशी बतावणी केली. थेट बँकेचे मॅनेजर स्वतःहून आपल्याला फोन करून विचारणा करीत असल्याचे पाहून श्री. पाटील यांनी तात्काळ आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी संबंधित व्यक्तीला दिला. याचा गैरफायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने श्री. पाटील यांच्या बँकेतील खात्यामधून परस्पर २५ हजार रुपये आपल्या 'पेटीएम' खात्यात वर्ग करून फसवणूक केली. आपल्या खात्यातील रक्कम परस्पर काढली असुन, आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात येताच पाटील यांनी लगेच सटाणा पोलीस ठाणे गाठले आणि अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदविली. 

दरम्यान, कुणीही अज्ञात व्यक्तीने आपला बँक खाते क्रमांक, एटीएम क्रमांक, आधार क्रमांक, पिन क्रमांक, पेन कार्ड क्रमांक, ओटीपी आदी बाबींविषयी माहिती विचारल्यास याबाबत संबंधित व्यक्तीला काहीही न सांगता थेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी केले आहे.

Web Title: Twenty-five thousand cheating by OTP